वंचित बहुजन आघाडी मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार..

मोहोळ (कटुसत्य. वृत्त.): मोहोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार असल्याचे तालुकाध्यक्ष पांडूरंग खांडेकर यांनी जाहीर केले. यामुळे ग्रामीण भागातील राजकारणात रंगत येणार आहे.
सोमवार २१ डिसेंबर रोजी माजी जिल्हाध्यक्ष पोपट सोनवणे, जिल्हा सचिव तुकाराम पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ येथील गुरुनाथ मंगल कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत स्वबळावर लढण्याचे ठरले आहे. मोहोळ तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींपैकी ७६ ग्रामपंचायत निवडणूक जाहिर झालेली आहे. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार झाले आहेत. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच वंचित बहुजन आघाडी ग्रामपंचायत निवडणूक स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे निश्चितच ग्रामीण भागातील राजकीय समीकरणे बदलणार असून प्रस्थापितांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीसाठी माजी जिल्हाध्यक्ष पोपट सोनवणे, जिल्हा सचिव तुकाराम पारसे, तालुकाध्यक्ष पांडुरंग खांडेकर, भारत कसबे, शशिकांत सोनवणे, विनीत गायकवाड, समाधान वाघमारे, विजयकुमार भालेराव, प्रशांत कसबे, सचिन गवळी, आकाश सरवदे इत्यादींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments