Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक ७ चा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी मुस्ताक शेख यांच्या उमेदवारीची गरज..

प्रभाग क्रमांक ७ चा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी मुस्ताक शेख यांच्या उमेदवारीची गरज..

गतवेळी किंगमेकर ठरलेले मुस्ताक शेख हेच या प्रभागातील उमेदवारीचे प्रबळ दावेदार

मोहोळ (साहील शेख)(कटुसत्य. वृत्त.): मोहोळ शहराच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या प्रभाग क्रमांक सात मध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत. सध्या या प्रभागाचे प्रतिनिधित्व विद्यमान नगराध्यक्ष शाहीन शेख या करत असल्या तरी या प्रभागावर यापूर्वी पासुनच स्वीकृत नगरसेवक पदावर असलेले मुस्ताक अहमद शेख यांचा प्रभाव आजही कायम आहे. मुस्ताक अहमद शेख हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा मोहोळ शहराचे विकास मार्गदर्शक राजन पाटील यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. गट निवडणुकीला हा प्रभाग ओबीसी महिला म्हणजे इतर मागास प्रवर्ग महिला आरक्षणासाठी आरक्षित होता.या प्रभागातून सध्याच्या नगराध्यक्षा शाहीन शेख यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देत काँग्रेसच्या पक्ष चिन्हावर मोठ्या बहुमताने निवडून आणले होते. शाहीन शेख यांच्या विजयाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार हे राष्ट्रवादीचे सर्व जिगरबाज पदाधिकारी ठरले होते. स्विकृत पदी असलेले नगरसेवक मुस्ताक अहमद शेख आणि राजन पाटील यांना मानणारा प्रभागातील ज्येष्ठ आणि युवा कार्यकर्त्यांचा संच  यांनी अथक परिश्रम घेत शाहीन शेख यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता. या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या पाच वर्षांपासून मुस्ताक शेख हे सातत्याने प्रयत्नशील राहीले आहेत हे प्रभागातील सुजान जनतेने वेळोवेळी पाहिले आहे. त्यामुळे या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी बाबत मुस्ताक शेख यांचे पारडे सध्या जड असल्याचे जाणवत आहे. केवळ प्र भागातच नव्हे तर संपूर्ण शहराच्या राजकारणात मुस्ताक शेख हे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित आहेत शांत आणि संयमी स्वभाव इतकेच हसतमुख व्यक्तिमत्व असल्यामुळे मुस्ताक शेख यांना सध्यातरी प्रभागातूनतुन कोणाचा विरोध जाणवत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या प्रभागातून मुस्ताक शेख यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मुस्ताक अहमद शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रामाणिकपणे झटत असलेले अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून शहरात ओळखले जातात. शिवाय अनगरकर पाटील परिवाराचे ते विश्वासू समर्थक देखील आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक सातच्या विकासाचा उर्वरित टप्पा पूर्ण करण्यासाठी मुस्ताक शेख यांनाच येत्या नगरपरिषद निवडणुकीत संधी देण्याची मागणी प्रभागातील निष्ठावंत राष्ट्रवादी कार्यकर्ते त्यातून व्यक्त केली जात आहे.

मोहोळ शहरातील गत पाच वर्षापुर्वीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपरिषदेतील सत्ता स्थापन घडामोडीत मुस्ताक शेख हे अग्रस्थानी राहिले आहेत. सत्तेचा समतोल साधण्यासाठी इतरांना पदे मिळवून देणाऱ्या मुस्ताक शेख यांनी स्वतःसाठी  कोणत्याही पदाची अपेक्षा कधी केली नाही. तरीही मुस्ताक शेख यांची राजकीय कोंडी करण्यासाठी सध्या प्रभागात विविध डावपेच आणि खेळ्या केल्या जात आहेत. मात्र या प्रभागातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते मुस्ताक शेख यांच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.शेख यांच्या आजवरच्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांनी स्विकृत नगरसेवक पदाची महत्त्वाची संधी ते इच्छुक नसतानाही दिली हीच त्यांच्या निष्ठेची पोचपावती ठरली. मोहोळ शहरात फक्त आणि फक्त राजन पाटील यांच्या निष्ठावंत समर्थकांच्या यादीमध्ये पहिल्या पाच क्रमांकात स्थान असलेले मुस्ताक शेख हे या प्रभागातील उमेदवार असल्यास निश्चितपणे ते हा प्रभाग राष्ट्रवादीच्या ताब्यात पुनश्च ठेवण्यात यशस्वी होऊ शकतात.

Reactions

Post a Comment

0 Comments