Hot Posts

6/recent/ticker-posts

रिपाइं महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली

रिपाइं महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली

मोहोळ तालुक्यात रिपाइं अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांचा वाढदिवस विविध उपक्रमानी साजरा

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांचा वाढदिवस रिपाइं महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

मोहोळ येथे रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू लोकांना प्रत्येकी पाच किलो गव्हाचे वाटप रिपाइं पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे उपाध्यक्ष हणमंत कसबे,रिपाइं मोहोळ तालुका अध्यक्ष विठ्ठल क्षीरसागर, मोहोळ रिपाइं शहर अध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते करण्यात आले. मोहोळ तालुक्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले.

यावेळी रिपाइं तालुका युवक अध्यक्ष रजनीश कसबे, तालुका सरचिटणीस नानासाहेब सोनवणे, शिरीष ढवळे, दाजी जगताप, ज्ञानेश्वर उघडे, मिलिंद कुचेकर, अंकुश शेंडगे, जिब्राईल शेख, बबलू शेख, मनसुद इनामदार, आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments