केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी महिलानी केले भाकरी थापून आंदोलन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 27, 2020

केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी महिलानी केले भाकरी थापून आंदोलन

केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीविरोधात रस्त्यावर चूल मांडून राष्ट्रवादी महिलानी केले भाकरी थापून आंदोलन

सोलापूर (कटूसत्य वृत्त): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खा. सुप्रियाताई सुळे व महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सौ. रूपालीताई चाकणकर यांच्या सुचनेनुसार सोलापूर शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी चार पुतळा येथे केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीविरोधात निषेधात्मक रस्त्यावर चूल मांडून त्यावर भाकरी थापत आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. कोरोना सारख्या महामारीच्या काळात आधीच सामान्य जनतेचे आर्थिक, कौटुंबिक व मानसिक कंबरडे मोडलेले असताना केंद्र सरकारने नुकतेच गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करून सामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. त्यामुळे अशा या निर्ढावलेल्या केंद्र सरकारच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र महिला निरीक्षक सौ. भारतीताई शेवाळे व महिला शहराध्यक्ष सौ. सुनीताताई रोटे यांच्या प्रमुख नेतृत्वात सोलापुरातील महिला पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी युवती पदाधिकारी यांनी आंदोलन केले.

बहुत हुयी मेहांगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार
हाय हाय मोदी सरकार हाय हाय
गांधी लढे थे गोरो से हम लढेंगे चोरो से
गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे

अशा घोषणांनी महिला व युवतींनी परिसर दणाणून सोडला होता.

या आंदोलनप्रसंगी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, निशांत सावळेसह इतर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. या आंदोलनाला युवती अध्यक्ष आरती हुळ्ळे नसीमा शेतसंदीं, गौरा कोरे, लता ढेरे, सुनिता गायकवाड साठे, आफ्रिन पटेल, कल्पना पारडे, उषा बेसरे, लताताई फुटाणे, पूजा ताजने, अस्मिता निकम, संगीता शहापूरकर, निकिता ताजणे, कोमल वसेकर, वंदना भिसे, जया नाकोड, सिया मुलानी, पुनम पवार, उषा बामणे, पूजा वाकसे, सुप्रिया लोमटे, शशिकला कसपटे, नंदा जानकर, मंगल जगताप, कविता कोडवान, कांता बनसोडे आदी महिला व युवती पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

तसेच तनवीर गुलजार, रुपेश भोसले, मिलिंद गोरे, युवराज माने, सोमनाथ शिंदे, बसवराज कोळी, ज्योतिबा गुंड,  पद्मसिंह शिंदे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages