Hot Posts

6/recent/ticker-posts

भोपसेवाडीत उपसरपंचासह मातब्बर नेतेमंडळींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

भोपसेवाडीत उपसरपंचासह मातब्बर नेतेमंडळींचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

सांगोला (कटूसत्य वृत्त): ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच तालुक्यातील प्रस्थापित असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला जबर धक्का देत भोपसेवाडी ता. सांगोला येथील उपसरपंच नारायण कोंडीबा गवंड यांच्यासह खंडू शिवाजी श्रीराम व दत्तू बापू नरळे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी रविवार दि 27 रोजी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत जवळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

विधानसभा निवडणूक झाल्यापासून सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात आपली ताकद दिवसेंदिवस मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. मा.आम. दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या सशक्त नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रसार वेगाने होऊ लागला आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भोपसेवाडी ता.सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पाडून राष्ट्रवादी काँग्रेसने शेकापला जबर धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे राज्याचे उपाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पक्षात नव्यानेच प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करुन त्यांना आगामी काळात पक्ष संघटना तळागाळापर्यंत वाढविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी भोपसेवाडी परिसरातील तानाजी गावडे, भगवान नायकुडे, गुलाब श्रीराम, अंकुश श्रीराम, वसंत नरळे, संजय श्रीराम, चंद्रकांत नरळे, किसन नरळे, आनंदा नायकुडे, आबा बुरंगे, धुळा आगलावे, रामचंद्र नायकुडे सर, शिवाजी गावडे सर, शंकर नरळे, संजय चौगुले, ईश्वर नरळे, दादा वगरे, कुमार कारंडे, श्रीपती गावडे, सोमनाथ नरळे, बापू नरळे, आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिपकआबांशिवाय पर्याय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षात रात्रीचा दिवस आणि रक्ताचे पाणी करून काम केले प्रसंगी राष्ट्रवादीला आणि आबांनाही विरोधी केला. परंतु मा.आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी कधीही पक्ष पार्टी किंवा अन्य भेदभाव न करता नेहमीच सामान्य नागरिक केंद्रभूत मानून विकासकामात कोणतेही राजकारण न करता आजवर आम्हाला सर्वतोपरी सहकार्य केले म्हणून सांगोला तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात दिपकआबांशिवाय दुसरा पर्याय आम्हाला दिसत नाही. - नारायण कोडींबा गवंड (मा.उपसरपंच, भोपसेवाडी)

Reactions

Post a Comment

0 Comments