शिवसेनेच्या आंदोलनाला अखेर यश ऊसदराची कोंडी फुटली नागेश वनकळसे यांच्या अंदोलनाला यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Sunday, December 27, 2020

शिवसेनेच्या आंदोलनाला अखेर यश ऊसदराची कोंडी फुटली नागेश वनकळसे यांच्या अंदोलनाला यश

शिवसेनेच्या आंदोलनाला अखेर यश ऊसदराची कोंडी फुटली नागेश वनकळसे यांच्या अंदोलनाला यश

मोहोळ (कटुसत्य वृत्त): गेल्या दीड महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये ऊस दराबाबत जे संभ्रमाचे वातावरण होते त्याला आता पूर्णविराम पूर्णविराम मिळाला आहे. साखर कारखानदारांनी ऊसदराची कोंडी फोडलेली आहे मोहोळ तालुका शिवसेनेचे युवानेते नागेश वनकळसे यांनी ऊसदराची कोंडी फुटावी म्हणून महाराष्ट्राचे साखर आयुक्त कार्यालय पुणे येथे आंदोलन केले होते त्यांच्या आंदोलनाची दखल साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेऊन सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांना ऊसाचा भाव जाहीर करण्याबाबत पत्र पाठवले होते. त्यानुसार कारखानदारांनी उसाचा दर जाहीर केला आहे गेल्या दीड महिन्यात पेक्षा जादा दिवस ऊस दराची न फुटलेली कोंडी आता फुटली आहे. 

साखर कारखान्यांनी खालीलप्रमाणे एफ. आर. पी. दिलेली आहे .पांडुरंग श्रीपुर -२४३१, विठ्ठल गुरसाळे- २१०६, दामाजी मंगळवेढा- २११९, जकराया शुगर वटवटे - २०६८, युटोपीयन शुगर- २११६, जय हिंद शुगर -२०५७, गोकुळ धोत्री- २०१८, माऊली शुगर तडवळ- २०८४ ,मातोश्री लक्ष्मी  रुदेवाडी- १९५१, सासवड माळी- २२९१, सहकार महर्षी अकलूज -२३२०, संत कुर्मदास लऊळ- २०६७, संत शिरोमणी भाळवणी- २१५२, लोकनेते अनगर- २२८१, इंद्रेश्वर बार्शी- २२२६, भीमा टाकळी- २२८७ ,विठ्ठल रिफायनरी- २१९८, बबनराव शिंदे- २१८२, विठ्ठलराव शिंदे-२३७०,सिद्धनाथ तिऱ्हे-२१२५, सिद्धेश्वर कुमठे -२११८, लोकमंगल  भंडारकवठे- २११७, लोकमंगल दारफळ- २०५१, भैरवनाथ आलेगाव-२०९०,मकाई करमाळा-२३२३, भैरवनाथ विहाळ-१९०८, विठ्ठलराव शिंदे २- २३७७, विठ्ठल कारपोरेशन-२१९८, भैरवनाथ लवंगी-१९६१. याबाबत बोलताना नागेश वनकळसे म्हणाले की ऊत्पादक शेतकरी आपला घालत असलेला ऊस नेमका किती रकमेचा होतोय आणि कारखाना आपणाला किती देणे लागतो हे समजेल, शेतकऱ्यांना विनंती आहे कारखान्याची पत पाहून कारखान्याला ऊस घाला, कारखाना व्यवहाराला चोख नसेल तर त्याला ऊस देऊन अडकून बसू नका चांगल्या कारखान्याला ऊस घाला  असे आवाहन नागेश वनकळसे यांनी यावेळी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages