Hot Posts

6/recent/ticker-posts

विनाअनुदानित धोरण म्हणजे शिक्षणव्यवस्थेला कलंक - माऊली पवार

विनाअनुदानित धोरण म्हणजे शिक्षणव्यवस्थेला कलंक - माऊली पवार

सोलापूर (कटूसत्य. वृत्त.): शिक्षक हा राष्टृ निर्माता आहे.देश घडवण्याचे कार्य शिक्षक करतात परंतु विनाअनूदान धोरणामुळे शिक्षक देशोधडीला लागत आहेत. अनेक शिक्षकांचे आयुष्य विनाअनुदानित धोरणामुळे  उद्ध्वस्त झाले आहेत.काही शिक्षकांनी आत्महत्या केल्या. विनाअनुदानित धोरण म्हणजे शिक्षण व्यवस्थेला लागलेला कलंक आहे.असे मत सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक माऊली पवार यांनी व्यक्त केले.

डाॅ.पंजाबराव देशमुख राष्टीृय शिक्षक परिषदेच्या पदाधिकारी निवडीप्रसंगी ते बोलत होते. साने गुरुजी  शिक्षक पतसंस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर संघटनेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण, मुख्याध्यापक संघटनेचे शहर सचिव धनाजी मोरे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन लढा उभा करावा.शासनाने विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्येकडे सकारात्मक दृष्टीृकोनातुन पाहावे. या धोरणात लवचिकता आणली पाहिजे. यावेळी माध्यमिक जिल्हाध्यक्षपदी विशाल काळे, शहर अध्यक्षपदी समीर शेख, दक्षिण सोलापुर तालुकाध्यक्षपदी बंदेनवाज शेख यांची निवड करण्यात आली. त् प्राथमिकच्या जिल्हाध्यक्षपदी विनोद आगलावे यांची फेरनिवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकार्‍यांना माऊली पवार यांच्या हस्ते निवडपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. या कार्यक्रमास राजकिरण चव्हाण, अनिल गायकवाड, नारायण पवार, श्रीराम जाधव, संतोष रजपुत, गिरीश शिंदे, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महासचिव सुनिल चव्हाण यांनी केले. सुत्रसंचालन अतुल नारकर यांनी तर नारायण पवार यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments