सांगोल्यातून दिल्लीसाठी दोन किसान रेल्वे सुरू होणार ? चेतनसिंह केदार-सावंत यांची खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, December 12, 2020

सांगोल्यातून दिल्लीसाठी दोन किसान रेल्वे सुरू होणार ? चेतनसिंह केदार-सावंत यांची खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे मागणी

 सांगोल्यातून दिल्लीसाठी दोन किसान रेल्वे सुरू होणार ? चेतनसिंह केदार-सावंत यांची खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे मागणी

सांगोला (कटूसत्य. वृत्त.): शेतकऱ्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शेतीमाल व जीवनावश्यक वस्तूची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी सांगोला रेल्वे स्थानकातून दिल्लीसाठी आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खा. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली आहे. तसेच द्राक्ष, खरबूज, कलिंगड व बोर या फळांना देखील वाहतूक दरात 50 टक्के सवलत मिळावी अशी मागणी केली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी दिली.

सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दिल्लीची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी सांगोला मार्गे किसान रेल्वे सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल, सोलापूर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्यासह रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून रेल्वे मंत्रालयाने सांगोला ते मुझफ्फरपूर, बंगळूर-सांगोला- आदर्शनगर (दिल्ली), सांगोला-सिकंदराबाद, सांगोला-शालिमार (कलकता) या चार किसान रेल्वे सांगोल्यातून सुरू केल्या आहेत. 

शेतीमाल, भाज्या, फळे या घटकाच्या व्यापाराकरिता व्यापारी, शेतकऱ्यांना किसान रेल्वे उपयुक्त ठरलेल्या किसान रेल्वे ठरली आहे. शेतकऱ्यांचा किसान रेल्वेला वाढता प्रतिसाद मिळत असल्याने शेतकऱ्यांसह रेल्वेला फायदा झाला आहे. शेतीमाल व जीवनावश्यक वस्तूची जलदगतीने वाहतूक करण्यासाठी सांगोला रेल्वे स्थानकातून मंगळवार व गुरुवार या दोन दिवशी आदर्शनगर साठी (दिल्ली) आणखी दोन किसान रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल व खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे केली असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह (बाळासाहेब) केदार-सावंत यांनी दिली.

केंद्राच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रायोगिक तत्त्वावर ऑपरेशन ग्रीन योजनेचा विस्तार करून फळे आणि भाजीपाला या कक्षेत आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार फळे व भाजीपाला रेल्वेतून वाहतूक करण्यासाठी 50 टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यात द्राक्ष, खरबूज, कलिंगड व बोर या फळांना देखील वाहतूक दरात 50 टक्के सवलत मिळावी अशी मागणी चेतनसिंह (बाळासाहेब)  केदार-सावंत यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages