..... अन्यथा कारखाने बंद पाडू - अतुल खुपसे -पाटील

टेंभुर्णी (कटूसत्य. वृत्त.) : साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने होत आले तरीही काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे एफ आर पी ची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर ते अद्यापि जमा केलेली नाही थकित एफ. आर. पी. ची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर सोळा तारखेपर्यंत एकरकमी जमा करावी अन्यथा जिल्ह्यातील साखर कारखाने बंद पाडू असा इशारा अतुल खूपसे पाटील यांनी टेंभुर्णी येथे रस्ता रोको आंदोलनादरम्यान दिला.
आज शुक्रवार दि 11 रोजी टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी रोड बायपास चौकामध्ये अतुल खूपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यांनी थकलेली एफआरपी शेतकऱ्यांना एकरकमी मिळावा यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना अतुल खूपसे पाटील म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी गाळपाचा उच्चांक करण्याची स्पर्धा करण्यापेक्षा कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कारखानदारप्रमाणे ऊस दर जास्त देण्याची स्पर्धा करावी. जिल्ह्यातील कारखानदार हे जरी वेगवेगळ्या पक्षात संघटनेमध्ये असेल तरीही शेतकऱ्यांना दर देण्याच्या वेळी सर्व कारखानदार एकत्र येऊन शेतकऱ्यांना दर कसा कमी देता येईल हेच पाहतात. जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये ऊसाची रिकव्हरी चोरीचे प्रमाण वाढले असून शेतकऱ्यांच्या उसाची रिकव्हरी शेताच्या बांधावरतीच तपासून तो ऊस कारखान्याला जावा त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचे वजन कुठल्याही वजन काट्यावर करण्याची मुभा द्यावी. सोळा तारखेपर्यंत मागण्या मान्य करून थकीत एफ आर पी एक रकमी शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा करावे अन्यथा जिल्ह्यातील कारखाने बंद करण्यात येतील असा इशारा दिला.
यावेळी बोलताना शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी ऊस कारखानदारांवर जोरदार टीका करत माढा तालुक्यात अनेक नेते सत्ताधाऱ्यांना विकले गेले असले तरीही अतुल भाऊ हे विकल्या जाणाऱ्या नेत्यांपैकी नाहीत असे म्हणत,इथून पुढे होणार्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये मी कुठल्याही पक्षाचा नेता म्हणून नव्हे तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून अतुल भाऊंच्या बरोबर सहभागी होईल सांगितले.
यावेळी केशव लोखंडे, शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल मस्के, पंढरपूर तालुक्याचे प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दत्ता व्यवहारे. मच्छीमार संघटनेच्या अध्यक्ष दिपाली ढीरे, माळशिरस प्रहार विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण भांगे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष बालाजी जगताप, टेंभुर्णी येथील युवा शेतकरी प्रशांत खुळे, त्यामुळे येथील युवक नेते समाधान पाटील आदींनी आपले विचार यावेळी व्यक्त केले.
या रास्ता रोको साठी अमोल जगदाळे सुधीर महाडिक रासपचे नेते दिलीप गडदे सुभाष इंदलकर सतिष सूर्वे सापटणे चे सरपंच दत्तात्रय ढवळे मदनदास महाडिक टाकळीचे विनायक केचे भाऊ पवार रामचंद्र टकले रयत क्रांती चे सुरेश पाटील समाधान अनपट निवृत्ती तांबवे विजय कोकाटे कल्याण गवळी विशाल उकिरडे बालाजी तरंगे विकास धोत्रे बाळासाहेब ढगे जयसिंग ढवळे गिरीश तांबे महेश पाटील जगदीश पाटील दीपक खूपसे चंद्रकांत कुटे अमोल गरड अक्षय ढवळे यावेळी विविध पक्षाचे व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी यावेळी कारखानदारांचा प्रतीकात्मक पुतळा बनून गुलाल टाकून पांढरे कापड टाकून काटे वरती जो पुण्यात आला होता ती ताटी पेटवण्याचा अतुल खूपसे पाटील यांनी प्रयत्न करतात पोलिसांनी धडक मारून तो पुतळा ताटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्या व पोलिसांमध्ये धरपकड झाली पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन आंदोलकांना पुतळा जाळण्या पासून रोखण्यात पोलिसांना यश आले.
या आंदोलनाच्या बंदोबस्तासाठी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे राज्य गुप्त वार्ता विभाग सोलापूरचे पीएसआय सुशील कोळी,एपीआय एस शितोळे,पोलीस कॉन्स्टेबल गुटाळ,बोराटे,मारकड,नरसाळे, यांच्यासह 20 कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments