स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चा टेंभुर्णी शहराच्या वतीने अभिवादन

टेंभुर्णी (कटूसत्य. वृत्त.): भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व दिगवंत माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा शहर च्या वतीने महादेव गल्ली टेंभुर्णी येथे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले,यावेळी स्व मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन टेंभुर्णी गावचे उपसरपंच धनंजय गोंदील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे टेंभुर्णी शहराध्यक्ष विजय भाऊ कोकाटे यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी भाजपा तालुका प्रसिद्धीप्रमुख सुरज भैय्या देशमुख, भाजयुमोचे टेंभुर्णी सरचिटणीस अविनाश धोत्रे, शहर सचिव महेश अवसलकर, शहर कार्याध्यक्ष प्रकाश हिंगमिरे, कार्यकारिणी सदस्य सुदर्शन ढगे, प्रवीण कदम, कैलास आतकर, पंकज काशीद, योगीराज शिरसागर यांच्यासह शहरातील इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments