Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला ग्रामपंचायत महामुकाबला ; महाविकास आघाडी विरुद्ध शेकाप ; भाजपा रंगणार सामना

सांगोला ग्रामपंचायत महामुकाबला ; महाविकास आघाडी विरुद्ध शेकाप ; भाजपा रंगणार सामना


सांगोला (कटूसत्य. वृत्त.): सांगोला तालुक्यातील मुदत संपलेल्या 61 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यादृष्टीने विविध राजकीय पक्षाच्या गावपुढा-यांनी मोर्चे बांधणीस सुरूवात केली आहे. सरपंच व सदस्यपदासाठी इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान 61 ग्रामपंचायतीच्या निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस, काॅग्रेस (आय) आरपीआय (कवाडे गट) व राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्रित येवून तर शेकाप व भाजप स्वबळावर निवडणूकीला सामोरे जाणार असुन निवडणूका रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

सांगोला तालुक्यात आतापर्यंत झालेल्या सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका माजी आ.गणपतराव देशमुख व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.दिपक साळुंखे पाटील यांनी ( शेकाप- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) युती करूनच लढविल्या आहेत.त्यामुळे तालुक्यातील सहकारी संस्था व काही ग्रामपंचायत वगळता बहुतांशी ग्रामपंचायतीवर शेकाप-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.मात्र एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टींत आंतर पडले आहे.शेकाप,राष्ट्रवादी चे कार्यकर्ते एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. कारणही सर्वाना सर्वश्रृत आहे. त्यामुळे शेकापक्षाने सध्यातरी एकला चलोची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आ.शहाजीबापू पाटील आणि मा.आ.दिपक साळुंखे पाटील एकमेकांच्या जवळ आल्याने दोघांच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवार 11 डिसेंबर रोजी माहे एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला.त्यामुळे सांगोला तालुक्यातील मुदत संपलेल्या 61 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाल्याने कार्यकर्त्याचे लक्ष्य कोणता नेता कोणासोबत युती करणार? याकडे लक्ष्य लागले आहे.असे असलेतरी आ.शहाजीबापू पाटील , मा.आ.दिपक साळुंखे पाटील व काँग्रेसचे प्रा.पी. सी झपके असे तिघेजण मिळून 61 ग्रामपंचायतीच्या निवडणूका लढविणार आहेत. शेकापक्षाचे जेष्ठ नेते मा.आ.गणपतराव देशमुख हे स्वबळावर निवडणूकीला सामोरे जाणार की स्वबळावर लढविणार हे गुलदस्त्यातच आहे. यंदा भाजपाही ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उतरणार असून कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. दरम्यान 61 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी बुधवार 23 ते बुधवार 30 डिसेंबरपर्यंत स.11ते दु.3 यावेळेत अर्ज दाखल केले जाणार आहेत. अर्जाची छाननी गुरूवार 31 रोजी होणार असून सोमवार 4जानेवारी 021 दु.3 पर्यंत अर्ज माघारी घेतले जातील तर त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची याद्या प्रसिद्ध होणार आहेत शुक्रवार 15 जानेवारी रोजी स.7:30 ते सांय.5:30 पर्यंत मतदान होवून सोमवार 18 जानेवारी रोजी मतमोजणी असा निवडणूकीचा कार्यक्रम असणार आहे. 

तालुक्यातील 61ग्रामपंचायतीच्या निवडणूका शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस , काॅग्रेस (आय ), राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट) यांच्याशी युती करून लढविणार आहोत.यंदाच्या ग्रामपंचायतीच्या निकालाचे चित्र बदललेले असेल - आ.शहाजीबापू पाटील 

शेकापकडून 61 ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्वबळावर लढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,असे असलेतरी त्या त्या गावातील पक्षाच्या पदाधिका-यांना परिस्थितीनुसार युतीचे अधिकार दिले आहेत.गावपुढा-यांनी एकदा युतीचा निर्णय घेतल्यानंतर पक्ष त्यामध्ये हस्तक्षेप करीत नाही- भाई विठ्ठलराव शिंदे, चिटणीस 

भाजप 61 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. कोणासोबत युती करायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेणार असून यंदाच्या निवडणूकीत अनेक ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता असेल हे मात्र निश्चित-चेतनसिंह केदार, तालुकाध्यक्ष , भाजप 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी हाच पॅटर्न असणार आहे इतर समविचारी पक्षानेही सोबत घेऊन निवडणूक लढविणार आहोत- मा.आ.दिपक साळुंखे पाटील

Reactions

Post a Comment

0 Comments