Hot Posts

6/recent/ticker-posts

ज्योती क्रांती परिषेदेच्या शिबिरात ५१ जणांचे रक्तदान

ज्योती क्रांती परिषेदेच्या शिबिरात ५१ जणांचे रक्तदान

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना काळात महाराष्ट्र राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असल्याने त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते खा. शरदचंद्र पवार यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार  यांच्या सुचनेनुसार ज्योती क्रांती परिषद प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र प्रदेश व पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तथा नगरसेवक अतूल क्षिरसागर यांच्या वतीने ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यालय मोहोळ येथे करण्यात आले होते.

प्रसंगी सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुन सिताप सर हे होते व उदघाटक म्हणून प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर प्रमुख पाहुणे म्हणुन मिलिंद अष्टूळ,मुख्या.तलफदार सर,मुख्या.नाईकनवरे सर,बाळासाहेब जाधव,संगिता ताई पवार, लक्ष्मण घोडके सर, कैलास चव्हाण,तनवीर शेख, आबा कांबळे,संदीप सोनवणे, दिग्विजय वस्त्रे, साहेब वाघमारे,उमेश कांबळे,आनंद गायकवाड आदीजण उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक अतूल क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिलवंत क्षिरसागर, धनंजय माने, शुभम उंबरे, सागर अष्टुळ, सोमनाथ भालेराव, सिद्धार्थ एकमल्ले, सुलतान पटेल, आकाश सिताप, विजय लवटे, विशाल कांबळे, अभिजित विभुते, साजिद बागवान, रवी थोरात, आदींनी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments