सर्व क्षेत्राचे सखोल ज्ञान असलेला देशाचा कोहिनूर हिरा म्हणजे शरदचंद्र पवार - आ.यशवंत माने यांचे शुभेच्छा मनोगत


मोहोळमध्ये वर्च्युअल रॅलीत सहभाग नोंदवून शरदचंद्र पवार यांना शुभेच्छाराजन पाटील यांच्या उपस्थित पार पडला कार्यक्रम
मोहोळ (कटुसत्य. वृत्त.): सहकार पासून ते शिक्षण क्षेत्रापर्यंत तसेच सामाजिक क्षेत्रापासून ते विज्ञान क्षेत्रात त्याचबरोबर क्रीडा आणि उद्योग क्षेत्रात देखील सखोल ज्ञान आणि वैचारिक प्रगल्भता असणारे कोहिनूर हिरा म्हणजे आमच्या पक्षाचे संस्थापक शरच्चंद्र पवार आहेत. तळागाळात सर्वसामान्यांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवणार्या कार्यकर्त्याला आमदार, खासदार पदाची संधी देत थेट मंत्रीपदापर्यंत नेणारे देशातील एकमेव नेते शरदचंद्र पवार ठरले आहेत. त्यामुळे या गौरवशाली राष्ट्रवादी पक्षाचा लोकप्रतिनिधी असल्याचा मला सार्थ अभिमान तर आहेच मात्र पवार साहेब आणि पवार कुटुंबीयांबद्दल माझ्या मनात नितांत आदर आणि कृतज्ञता आहे. अशा आमच्या या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारिणीने आयोजित केलेला व्हर्च्यूयल रॅलीचा उपक्रम अतिशय प्रेरणादायी आणि अविस्मरणीय गोष्ट आहे असे गौरवोदगार मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने त्यांनी काढले.
देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन मोहोळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी शरदचंद्र पवार यांना शुभेच्छा देताना आमदार यशवंत माने बोलत होते.
यावेळी कार्यकर्त्यांना शुभेच्छापर मनोगत व्यक्त करताना राजन पाटील म्हणाले की एकूण महाराष्ट्राच्या विकासात्मक वाटचालीस शरदचंद्र पवार यांचे भरीव योगदान आहे. आदरणीय पवार यांच्याच मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य, समता, बंधुता, सर्वधर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही आणि विकास या संकल्पनांवर दृढ विश्वास ठेवून पक्ष अखंडित व प्रवाहीपणे आपले काम करीत आला आहे. अन्याय, अत्याचाराविरुद्ध प्रभावीपणे संघर्ष करून मागासवर्गीय, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, महिला, अपंग, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळावा यासाठी धोरणे आखून त्याच्या यशस्वी अमलबजावणीचे काम राष्ट्रवादी पक्षाने समर्थपणे पार पाडले आहे. युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘युवा धोरण’ जाहीर करून त्यांना सर्व क्षेत्रांत मोठ्य़ा संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. भविष्याचा वेध घेऊन त्यानुसार अविरत वाटचाल करणारा ‘राष्ट्रवादी’ हा देशातील एकमेव पक्ष आहे. असेही गौरवोद्गार माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजन पाटील यांनी काढले.
यावेळी माजी आमदार राजन पाटील मोहोळ विधानसभेचे आमदार यशवंत माने राष्ट्रवादी काँग्रेस ताअध्यक्ष प्रकाश चवरे, नाना डोंगरे, पंचायत समिती सभापती रत्नमाला पोतदार, उपसभापती अशोक सरवदे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भारत सुतकर जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी माजी संचालक सज्जन पाटील, लोकनेते माजी चेअरमन हनुमान पोटरे, उपनगराध्यक्ष प्रमोद डोके, संतोष सुरवसे,आनंद गावडे पंचायत समिती सदस्य व महिला अध्यक्ष सिंधुताई वाघमारे, राजशेखर पाटील , मोहोळचे ज्येष्ठ नेते शहाजान शेख, शुक्राचार्य तथा मकु हावळे शहराध्यक्ष चेतन मांडवे ,हेमंत गरड, सरचिटणीस प्रशांत बचुटे, विद्यार्थी काँग्रेसचे सुदर्शन कादे, उदयोजक विजय कोकाटे, नागनाथ सोनवणे जयवंत गुंड शशिकांत पाटील अविना राठोड जयवंत गुंड नागेश बिराजदार आदीसह राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भाऊ चवरे यांनी केले तर आभार प्रमोद बापू डोके यांनी मानले.
0 Comments