Hot Posts

6/recent/ticker-posts

बिबट्याची भीती काढण्यासाठी प्रशासनाने फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आश्वासक काम करण्याची गरज - नितीन झिंजाडे

बिबट्याची भीती काढण्यासाठी प्रशासनाने फुकटचे सल्ले देण्यापेक्षा आश्वासक काम करण्याची गरज - नितीन झिंजाडे

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): तालुक्यातील गावागावात बिबट्याची दहशत माजली आहे,बिबट्याची भीती काढण्यासाठी प्रशासनाने आश्वासक काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे यांनी केले आहे.

याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की,रोज कोणत्या ना कोणत्या गावात बिबटे दिसत आहेत.म्हणून बिबट्याना पकडण्यासाठी गावगावात पिंजरे बसवले पाहिजेत. करमाळा तालुक्यात गेल्या महिन्यापासून बिबट्याने दहशत माजवली असून आजपर्यंत तिन लोकांसह  अनेक जनावरांचा बळी घेत अनेकांवर प्राणघातक हल्ले केले आहेत.लोकांच्या जीवितहानीची नुकसानभरपाई मिळतेय परंतु याबरोबरच प्राण्यांच्या जीविहानीचीही नुकसानभरपाई वन खात्याने संबधीत लोकांना केली पाहिजे.आजही जिल्हा प्रशासन कागदी घोडे रंगवत आहे. भयग्रस्त भगात अधिकारी फक्त ठश्यांची पडताळणी करून सरसकट तरस प्राण्याचे ठसे आहेत असं सांगत आहेत. लोकांना फक्त सावध राहण्याचे फुकटचे सल्ले देत आहेत.माणसे व जनावरे यांची एवढी जीवितहानी होऊनही त्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात प्रशासनास फक्त अपयशच आले नाही तर त्यांनी आता शोधमोहिमेत हातच टेकले आहेत. हे भयानक आहे.एवढया मोठया प्रमाणात  बिबटे आले कसे व कुठून? का त्यांना कुणी व कशासाठी लोकवस्ती भागात सोडले? याबाबत आशा चर्चा लोकांत चालू आहेत.त्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश असले तरी ती मारला जात नाही ही वस्तुस्थिती आहे. याबरोबरच गावागावात निदर्शनास येणाऱ्या बिबटे व बिबट्यासदृश्य प्राण्यांना पकडण गरजेचे आहे. लोकांच्या मनातून बिबट्याची भीती घालवणे गरजेचे आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग प्रचंड दहशतिखली असून त्याचा त्यांच्या रोजच्या जीवनमनावर,कामधंद्यावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील गावागावात वन विभागाने बिबटे पकडण्याचे पिंजरे तातडीने उपलब्ध करून द्यावेत व लोकांची बिबट्याच्या दहशतीमधून सुटका करावी.

Reactions

Post a Comment

0 Comments