Hot Posts

6/recent/ticker-posts

निमगाव (ह) येथील शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी स्वाभिमानी करणार हालगीनाद आंदोलन

निमगाव (ह) येथील शेतकऱ्यांच्या रस्त्यासाठी स्वाभिमानी करणार हालगीनाद आंदोलन

करमाळा (कटूसत्य. वृत्त.): निमगाव (ह) येथील शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या मागणीकडे प्रशासन डोळेझाक करत आहे.त्वरित या शेतकऱ्यांना नरस्ता न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना हलगीनाद आंदोलन करणार असणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी तालुकाध्यक्ष अमोल घुमरे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

तहसीलदार करमाळा यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी  नमूद केले आहे की, निमगाव ता करमाळा येथील शेतकरी मारुती विनायक नीळ, दत्तात्रय दिगंबर नीळ, भाऊसाहेब दिगंबर नीळ आदी शेतकऱ्यांचे 79/अ, 79/ब या गट नंबर मध्ये ऊस पीक असून बांध रस्त्यासाठी तहसीलदार करमाळा यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार तहसीलदार करमाळा यांनी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी आदेश दिला होता . मात्र गट नंबर 69 ,व 70 मधील शेतकरी तहसीलदार यांचा आदेश पाळत नाहीत.  सदर शेतकऱ्यांनी तहसीलदार करमाळा यांच्याकडे रस्ता न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

सदर शेतकऱ्यांना त्वरित रस्ता उपलब्ध करून घ्यावा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना हलगीनाद आंदोलन करेल असा इशारा अमोल घुमरे यांनी दिला आहे. या निवेदनावर जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे,तालुकाध्यक्ष रामहरी शेळके, युवा नेते दीपक शिंदे,तालुका उपाध्यक्ष तानाजीराजे शिंदे यांच्या सह्या आहेत.  

Reactions

Post a Comment

0 Comments