Hot Posts

6/recent/ticker-posts

गतवेळी सतरा मताने हुकलेला विजय संपादित करण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार

गतवेळी सतरा मताने हुकलेला विजय संपादित करण्यासाठी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार


प्रभाग क्रमांक १ मधून युवानेते अजयदादा कुर्डे इच्छुक
अपेक्षित पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्षही लढण्याची तयारी

मोहोळ (साहील शेख)(कटूसत्य. वृत्त.): गतनगर परिषद निवडणुकीमध्ये प्रभागातील सुजान मतदार बंधू भगिनींच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मातोश्री अनिता कुर्डे यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रचाराला अल्प कालावधी मिळाल्याने दुसऱ्या क्रमांकाची तब्बल २४२ मते खेचून घेत केवळ १७ मतांनी पराभव पत्करावा लागला होता. पहिल्याच प्रयत्नात मतदार बंधू-भगिनी दिलेला प्रतिसाद आम्ही कुर्डे परिवार अजूनही विसरलो नाही. तरी निवडणुकीत पराभूत झालो म्हणून प्रभागातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आम्ही कुर्डे परिवार कधीही विसरलो नाही. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक १ मधील सर्व मतदार बंधू-भगिनीशी असलेला जनसंपर्काची अन आपुलकीची नाळ कधीही तुटू दिली नाही. यावेळी भाजपा ऐवजी अन्य पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहोत. जरी कोणत्या अपेक्षित पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्षपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे येत्या काळात होणारी नगरपरिषदेची निवडणूक  लढविण्यासाठी आम्ही पुनश्च सज्ज आहोत अशी स्पष्टोक्ती प्रभाग क्रमांक एक मधील नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार अजयदादा कुर्डे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गत नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून आमच्या मातोश्री अनिताताई कुर्डे यांना उमेदवारी दिली होती.पहिलीच वेळ असूनही शिवाय प्रचाराला वेळ कमी मिळूनही मतदार बंधू-भगिनींना अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळेच आम्हाला पहिल्या प्रयत्नात तब्बल २४२ मते प्रभागातील दिग्गज पक्षांच्या विरोधात मिळाली. गतवेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन केवळ सतरा मतांनी निसटता पराभव झाल्यामुळे या वेळी मला भाजप ऐवजी इतर पक्षाकडून उमेदवारी घेण्याची इच्छा आहे. मला अपेक्षित असलेल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्षपणे देखील निवडणूक लढण्याची आमची तयारी आहे. उमेदवार हा प्रभागातील स्थानिकच असावा असा मतदार बांधवांचा कल असल्याने आम्ही पुन्हा निवडणूक लढवणार आहोत. आमच्या प्रभाग क्रमांक १ मधील सुजाण जनता निश्चितपणे गतवेळी दिलेला निसटता कौल यावेळी विजयात रूपांतर करण्यासाठी भरभरून प्रतिसाद नक्कीच देईल यात कसलीही शंका नाही. त्यामुळे या प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी नगरसेवक होऊन गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्यांशी असलेले त्रुणानुबंध वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेही यावेळी अजयदादा कुर्डे म्हणाले.

गत निवडणुकीच्या वेळी ओबीसी महिला आरक्षण होते. त्यामुळे प्रभागातील स्थानिक उमेदवारी म्हणून आमच्या मातोश्री अनिताताई कुर्डे यांना भाजप कडून संधी दिली ती आमचा सर्वसामान्यांशी असलेला जनसंपर्क प्रभागातील सर्व प्रश्न सोडवण्याची अनेक वर्षापासून धडपड पाहूनच. आता आम्ही भाजपमधून निवडणूक लढविणार नसून आम्ही एका अन्य पक्षांकडून इच्छुक आहोत. सदर पक्षाच्या पक्षश्रेष्ठींची पहिल्या टप्प्यातील चर्चा देखील झाली आहे.आता जरी या प्रभागाचे आरक्षण सर्वसाधारण खुला प्रवर्ग निघाले तर मी स्वतः निवडणूक लढवणार आहे. आणि  जर सर्वसाधारण महिला असे आरक्षण झाले तर पुनश्च आमच्या मातोश्री अनिताताई कुर्डे या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आम्हाला अपेक्षित असलेल्या पक्षाने उमेदवारी दिली तरी निवडणूक लढवणार आहोत आणि जरी नाही दिली तरी अपक्षपणे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहोत. - अजयदादा कुर्डे (इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक एक)

Reactions

Post a Comment

0 Comments