Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीपूर्वी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर ऍक्टिव्ह मोडमध्ये

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीपूर्वी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर ऍक्टिव्ह मोडमध्ये


बारसकर यांचे सुचक मौन असले तरी समर्थकांमध्ये मात्र खदखद
बारसकर यांचा संभाव्य पावरस्ट्रोक सर्व पक्षीयांना परवडणारा नाही

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीचा फिवर मोहोळ शहर परिसरात चांगलाच वाढला आहे. सर्वच पक्षात राजकीय घडामोडींना जरी वेग आला असला तरी पडद्याआडच्या राजकीय घडामोडी स्पष्टपणे जाणवताना दिसत आहेत. मोहोळ नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आणि ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या सुचक भूमिकेकडे सध्या शहर आणि परिसरातील सर्व राजकीय नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून ज्योती क्रांती परिषद मोहोळ शहर आणि तालुक्यातील विविध महत्त्वाचे मुद्दे हातात घेऊन त्यासाठी शासन दरबारी प्रभावीपणे पाठपुरावा करत आहे. गेल्याच आठवड्यात मोहोळ शहरातील भुयारी मार्गाचा आणि रस्त्याच्या साईड पट्ट्यांचा मुद्दा उचलून धरत सर्वसामान्यांचे जाणारे बळी थांबावे यासाठी प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती क्रांती परिषदेने चांगलेच रान तापवले.

मोहोळ शहरात कोणत्याही निवडणुकीचे वातावरण असले की रमेश बारसकर यांची भूमिका सतत चर्चेत येते. शहरातील राजकीय घडामोडीचे केंद्रस्थान आजवर तेच ठरत आले आहेत. गत नग परिषद निवडणुकीतही राष्ट्रवादीसह इतर पक्षांच्या विरोधात दंड थोपटून त्यांनी अत्यंत स्वाभिमानी विचाराने मोहोळ विकास आघाडीची स्थापना केली. पहिल्याच प्रयत्नात मोहोळ विकास आघाडीने तीन जागा खेचून घेतल्या तर अन्य बर्‍याच ठिकाणी निसटता पराभव पत्करला. निकालानंतर शिवसेनेसोबत न जाण्याची भूमिका घेत राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेत बारसकर सहभागी झाले. शिवाय नव्याने स्थापन झालेल्या मोहोळ नगरपरिषदेचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा सन्मान त्यांनी आपल्या अचूक व्युहरचनेने खेचून घेतला.

वर्षभरापासून ज्योती क्रांती परिषद मोहोळ शहर तालुक्यात आणि जिल्ह्यातही सक्रिय झाली. ज्योती क्रांती परिषदेची संघटन कौशल्याची चुणूक उस्मानाबाद पासून ते पुण्यापर्यंत, अहमदनगर पासून ते सांगली पर्यंत पोहोचली. मोहोळ तालुक्यात आणि शहरातही ज्योती क्रांती परिषदेच्या शाखा धूमधडाक्यात स्थापन होऊ लागल्या बारसकर हे सुरुवातीपासूनच अथक कार्यरत असलेले आणि स्वयंभू विचारांचे नेतृत्व म्हणून शहराला परिचित आहेत. गवत्या मारुती चौकातून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द मंत्रालयापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मोठी मेहनत घ्यावी लागली. मोहोळ नगर परिषदेची धुरा हातात आल्यानंतर मोहोळ शहरात कोट्यावधीची विकास कामे सुरू करून विकासात्मक चेहरामोहरा बदलण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी झाला.

राष्ट्रवादीमध्ये मोठ्या निष्ठेने कार्यरत असलेल्या बारस्कर यांना शहराच्या स्थानिक राजकारणात मात्र अधून मधून डावलले जात असल्याची खंत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर बोलून दाखवली. विशेष योगायोगाने नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या बैठकीला बारसकर यांची अनुपस्थिती सर्वांनाच जाणवली. यावरून बारसकर पक्षाच्या शहरातील भूमिकेबद्दल नाराज तर नाहीत ना ? याचीही पडताळणी मनाचा मोठेपणा दाखवत पक्षश्रेष्ठींनी करून घेतली. मात्र ते रोहितदादा पवार यांच्या प्रचार सभेला उपस्थित राहून सदैव पक्षा सोबतच असल्याचे त्यांनी सर्वांना दाखवून दिले. नव्या इमारतीच्या जागा निश्चिती वेळी देखील.

मोहोळ शहरातील सत्ताधारी पक्षाचे सर्व नगरसेवकांनी अनगर येथील पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांची भेट घेऊन इमारत कोठे व्हावी याबाबत आपली भूमिका पुनश्च मांडली होती. मोहोळ नगरपरिषदेच्या निर्णय प्रक्रियेत राजन पाटील यांनी माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनाच सर्वाधिकार देत इतर सर्व सत्ताधारी नगरसेवकांना विश्वासात घेऊन  योग्य ते निर्णय घ्यावा अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. रमेश बारसकर आणि पक्षश्रेष्ठी राजन पाटील या दोघांचा वैचारिक समन्वय जरी उत्तम असला तरी बारसकर यांना मोहोळ शहरात राष्ट्रवादीतुन किती ताकद दयावी याबद्दल शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतमतांतरे आहेत. शहरातील पक्षश्रेष्ठी ठरविण्याच्या बैठकीमध्ये देखील बारसकर यांच्या निवडीला काही कार्यकर्त्यांनी मनोगतातून विरोध केला.

बारसकर यांच्या शहर नेतृत्वाला पक्षश्रेष्ठीं अनुकुल असताना बारसकर यांचे नेतृत्व नेमकं कोणाला आणि का नको आहे याबद्दल देखील वेग वेगळ्या चर्चा शहरात सुरू झाल्या.यावेळी पक्षश्रेष्ठींच्याही लक्षात काही गोष्टी आल्या  त्याच गोष्टी बारसकर यांच्या देखील लक्षात आल्यानेच बारसकर या निवडणुकीत पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्व शहराचे लक्ष लागले आहे.

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावरील त्यांनी गायलेली माझी  झोपडी नावाची कविता खूप गाजली. या कविते दरम्यान त्यांनी आपल्या हालचालीतून दर्शविलेला आक्रमक आवेश बरच काही सांगून जात होता. त्यामध्ये त्यांना वेळोवेळी पक्षा बाहेरून आणि पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधाची खदखद रोखठोकपणे  मांडण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न त्यांनी केला. बारसकर हे सुरुवातीपासूनच जरी साहित्य कला क्षेत्राचे उपासक असले तरी विविध भाषणांमधून कवितांमधून आणि वक्तृत्व कले अंतर्गत असलेल्या विविध गोष्टींमधून ते सर्वसामान्यांजवळ आपल्या मनातील तळमळ व्यक्त करताना जाणवतात. त्यांच्या त्या कवितेनं तर मोहोळ शहरातील विविध पक्षाचे नेते सावध झाले. बारसकर यावेळी देखील वेगळी भूमिका घेऊन स्वतंत्र आघाडीची स्थापना करतात की काय असे तर्क वितर्क लढवले जाऊ लागले.शहराच्या अंतर्गत गटबाजी मध्ये बारसकर यांची वेळोवेळी किती जरी कोंडी करण्याचा प्रयत्न झाला तरी काही निवडणुकीत कोणासोबत रहायचे आणि कोणाची सोबत टाळून राजकारण करायचे याचे परफेक्ट टाइमिंग बारसकर यांना जमलेले आहे. त्यामुळे बारसकर यांना वगळून राजकीय व्यूहरचना लावणे सध्यातरी राष्ट्रवादीला परवडणारे नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments