मोहोळ येथे स्टार क्रीडा सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न 35 रक्तदात्यांनी केले रक्तदान

मोहोळ (कटूसत्य. वृत्त.): कोरोना काळात राज्यातील रुग्णालयामध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने स्वय स्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे .असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या शब्दाला सन्मान देऊन .मोहोळ येथील स्टार क्रीडा सांस्कृतिक व बहुउद्देशीय मंडळ यांच्या वतीने मरहूम दादामिया (शकुर) अब्दुल इनामदार. यांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते. हे रक्तदान शिबिर मोहोळ येथील शहाजीराव पाटील सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते यावेळी 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास पाच लिटरचा कुकर म्हणून भेटवस्तू देण्यात आली. या उद्घाटन नगरसेवक तथा राष्ट्रवादी संघटक मुस्ताक शेख, यांच्या शुभहस्ते करण्यात आले.माजी नगराध्यक्ष शौकत भाई तलफदार,आयुब इनामदार सर, युवानेते जिब्राइल भाई शेख, हजरत शेख इत्यादी सह शहरातील नागरिक आणि रक्तदाते उपस्थीत होते.
यावेळी रक्तदान हे जीवदान असते. या काळात रक्तदान करणारे नागरिक खरे योद्धे वाटतात . रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक आहे. रक्तदाते रक्तदान करून माणुसकीचे बंध दृढ करत आहे . या काळात समाजातील परस्परांतील वाद विवाद विसरून एकजुटीने उभे राहणे गरजेचे आहे . महामारीच्या काळात अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. परंतु अनेक लोकांचे प्राण रक्तदानामुळे वाचू शकतात , त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान आणि प्लाज्मादान करून देशासमोरील या संकटाला एकीने समोर जाऊ , असे आयोजक मन्सुर ईनामदार यांनी केले आहे.
0 Comments