कृषी कायद्याविरुद्ध मोडनिंब मध्ये कडकडीत बंद

मोडनिंब (कटूसत्य. वृत्त.): नवे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला मोडनिंब येथे व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला. आज सकाळी सर्व प्रकारच्या व्यवसायिकांनी आपापले व्यवसाय सुरू केले होते.
कृषी कायद्याविरुद्ध शेतकर्यांचा एल्गार म्हणून आज भारत बंद ठेवण्यात येणार असल्याच्या सर्व वर्तमानपत्रातील बातम्या आणि वृत्तवाहिन्यांवरील प्रसारित झालेल्या बातम्या याबाबत मोठी चर्चा सकाळीच सुरू झाली परिणामी उघडलेली सर्व दुकाने स्वतः व्यवसायिकांनी बंद केली. शासकीय कार्यालये, बँका, औषध दुकाने वगळता सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवल्याने मोडनिंब मध्ये कडकडीत बंद यशस्वी ठरला.
मजकूर.. स्वयंस्फूर्तीने केले व्यवसाय बंद..
मोडनिंब येथे मोठी बाजारपेठ असून कृषी कायद्याविरुद्ध पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनासंदर्भात कुणीही आवाहन न करता स्वयंस्फूर्तीने व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून प्रतिसाद दिला.
0 Comments