Hot Posts

6/recent/ticker-posts

मातोश्री कै.गिरिजाबाई ढोबळे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन पर विविध कार्यक्रम

मातोश्री कै.गिरिजाबाई ढोबळे यांच्या 9 व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन पर विविध कार्यक्रम

           मोहोळ (कटुसत्य वृत्त): फूड टेक्नॉलॉजी कॉलेज मोहोळ येथे मातोश्री कै. गिरीजाबाई ढोबळे यांच्या पावन समाधीस्थळावर पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, अनुराधा ढोबळे, सिद्राम जावीर साहेब,अब्राहम आवळे,क्रांती आवळे, कोमल ढोबळे, अजय साळुंखे, अभिजीत ढोबळे, शॅरोन ढोबळे शाहू परीवारातील मुख्याध्यापक, प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या दिनानिमित्त इन बॉउंड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे विभागाचे प्रमुख अजय साळुंखे साहेब व त्यांचे सहकारी  विनय पाटील, रोहित जाधव यांनी सोशल मीडिया वापराविषयी मार्गदर्शन केले.

जम्मत शाळा(कौशल्य विकास) या विषयी मराठी सिने अभिनेते मंदार कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री विठ्ठल माने यांनी मातृभक्तीपर गीताचे सादरीकरण केले.संस्थापक प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी आपले विचार व्यक्त केले.  संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे यांनी मातोश्री गिरीजाबाई बद्दल आपल्या आठवणी सांगितल्या.संस्थेच्या प्रशासन अधिकारी क्रांती आवळे मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले. सोशल मीडिया बद्दल कोमल साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शफीक तलफदार,सुधीर नाईकनवरे,प्राचार्य राहुल पाटील, संजय भोसले, धनाजी माने, संजय वाघमोडे, किरण इंगोले, प्रशांत कदम, महादेवी राजमाने, दिनकर मोरे, नागेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन आपल्या खास शैलीत श्री प्रमोद कोरे यांनी केले  व आभार कोमल ढोबळे साळुंखे यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments