प्रभाग क्रमांक एक मधून पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार - राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नागेश बिराजदार

इलेक्टिव्ह मेरीटचा अन्य उमेदवार राष्ट्रवादीत आल्यास त्याच्याही विजयासाठी प्रयत्न
मोहोळ (कटूसत्य वृत्त): प्रभाग क्रमांक एक हा मोहोळ शहराच्या सर्वपक्षीय राजकारणाचा श्रीगणेशा करणारा प्रभाग आहे. याच प्रभागात सर्व शहरवासीयांचे श्रद्धास्थान असलेले सिद्धनागेश मंदिर याच प्रभागात येते. या प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य व स्वच्छता विषयक समस्या सोडवणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांचा हा बालेकिल्ला असूनही या भागात म्हणावी तशी कामे होऊ शकली नाहीत. त्यामुळे या प्रभागातील सर्वसामान्य यांची नाराजी काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून एका सक्षम उमेदवाराची आवश्यकता आहे. म्हणूनच पक्षश्रेष्ठी माजी आमदार राजन पाटील, विद्यमान आमदार यशवंत तात्या माने, शहाजान मालक शेख यांची भेट घेऊन या प्रभागातून रितसर उमेदवारीची मागणी करणार आहे.
अशी घोषणा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नागेश बिराजदार यांनी केली. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. जरी पक्षाने राष्ट्रवादीचा इतर उमेदवारांचा विचार केला तरीही या प्रभागात राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार आहे.असेही यावेळी बिराजदार म्हणाले.
गत निवडणुकीच्या वेळी उमेदवारी निश्चितीसाठी व प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळू न शकल्याने या प्रभागात राष्ट्रवादीला चौथ्या क्रमांकावर राहावे लागले. आता यावेळी मात्र हा प्रभाग राष्ट्रवादीच्या ताब्यात यावा यासाठी व्यक्तिशः मी प्रयत्न सुरू केले आहेत. आमचे मार्गदर्शक राजन पाटील, आमदार यशवंत माने आणि शहाजान मालक शेख याने यांची भेट घेऊन या प्रभागातील उमेदवारीसाठी चाचपणी आम्ही सुरू केली आहे. पक्षाने जर मला संधी दिली तर मी ही निवडणूक लढविणारच आहे मात्र जर पक्ष अन्य पक्षातला उमेदवार आपल्या राष्ट्रवादी पक्षात घेऊन आणून त्याला जर उमेदवारी देऊन पक्ष ही जागा खेचून घेण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याला माझ्याही परिश्रमाची प्रामाणिकपणे साथ असेल. अशीही ग्वाही यावेळी बिराजदार यांनी दिली. पक्ष संधी देईल त्या प्रभागातून मी नगरपरिषद निवडणूक लढवण्याचाही आपला मनोदय असून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत केवळ राजन पाटील यांचेच नेतृत्व मान्य करून शहरात कार्य करत राहणार आहे अशी भावनिक ग्वाही देखील यावेळी बिराजदार यांनी दिली.
केवळ नगरसेवक पदासाठी अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाचं काम करणारा मी कार्यकर्ता नाही.माझे दैवत राजन पाटील, मार्गदर्शक यशवंत तात्या माने हे पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. ज्या पक्षाने खूप काही दिले असतानाही त्याच पक्षाविरोधात खेळ्या आणि गटबाजीचे वातावरण निर्मिती करणाऱ्यां ढोंगी पक्षनिष्ठेचे आणि डबलगेमचे राजकारण करणाऱ्यांवर माझे विशेष करून लक्ष असणार आहे. शहरातील सर्वसामान्य जनतेने विकास कामे कोण करते ? आणि स्वार्थाचे राजकारण कोण करते ? हे ओळखले आहे. त्यामुळे यापुढील काळाची राष्ट्रवादी पक्षासाठी निरपेक्ष भावनेने काम करत राहून पुनश्च मोहोळ नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी मी राष्ट्रवादी कार्याध्यक्ष पदाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार आहे. - नागेश बिराजदार (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी मोहोळ)
0 Comments