प्रभाग क्रमांक ७ चा चेहरामोहरा बदलण्यासाठी राजन पाटील यांचीच वेळोवेळी मदत

प्रभागातील सुजान जनता राष्ट्रवादी'ला कधीही विसरणार नाही..
प्रभागातील कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास
मोहोळ (साहील शेख): गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवारी मिळावी यासाठी जरी अनेकांचे प्रयत्न सुरू असले तरी या प्रभागात यापूर्वीच्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शाहीन शेख यांच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक मुस्ताक शेख यांच्याच नावाची चर्चा राष्ट्रवादी वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. प्रभाग क्रमांक सात मधील रस्ते पाणी आरोग्य व स्वच्छता विषयक त्याचबरोबर दिवाबत्तीच्या समस्या अगदी पोटतिडकीने आणि प्रामाणिकपणे सोडवण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले मुस्ताक शेख आमचे यांचेच पारडे सध्या राजकीयदृष्ट्या जड असून त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून निश्चित केली जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र याबाबत संयमी आणि अत्यंत परिपक्व धोरणाचे राष्ट्रवादी समर्थक असलेल्या मुस्ताक शेख यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. याबाबत त्यांना विचारले असता पक्षश्रेष्ठी राजन पाटील, दक्ष आमदार यशवंत तात्या माने, आणि मोहोळ शहरातील ज्येष्ठ नेते शहाजान मालक शेख हे उमेदवारीबाबतची जी धोरणात्मक भूमिका घेतील तीच आपल्याला सदैव मान्य असेल. जर आमच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारीची संधी दिल्यास हि निवडणूक लढवून नक्कीच विजयी होऊ असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये रस्ते, पाणी, आरोग्य विषयक सुविधा त्याचबरोबर स्वच्छतेसाठी चांगल्या दर्जाच्या गटारीचे काम देखील पूर्ण होत आली आहेत. नगरपरिषदेच्या सत्ता कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रभागाचे खऱ्या अर्थाने पालकत्व घेत राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे या प्रभागातील सुजाण जनता ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे असा विश्वास प्रभागातील सर्व राष्ट्रवादीच्या जिगरबाज कार्यकर्त्यांना आहे. नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. राजन पाटील यांनी वेळोवेळी या प्रभागातील समस्या सोडविण्याच्या सूचना मुस्ताक शेख यांना देत निधीची कधीही कमतरता भासू दिली नाही. या प्रभागातील रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळी राजन पाटील आले असता त्यांनी या प्रभागातील विकासकामांचे आवर्जून कौतुक करत यापुढील काळाची या प्रभागाला निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही दिली होती त्यामुळे यापुढील काळातही हा प्रभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
यात प्रभागातील सर्व विकास कामे पूर्ण करण्यासाठी विद्यमान नगरसेविका शाहीन शेख यांनी देखील मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांना मुस्ताक शेख यांची बहुमोल साथ मिळाल्याने या प्रभागाचा चेहरामोहरा बदलू शकला.या प्रभागात राजन पाटील यांच्या विकासधारेला मानणारा मोठा वर्ग सुरुवातीपासून कार्यरत आहे. दक्ष आमदार यशवंत माने यांनी तब्बल दहा कोटींचा विकास निधी आणून मोहोळ शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या प्रभागातील विकासकामांसाठी देखील नगरपरिषदेचे विकास मार्गदर्शक राजन पाटील आणि आ. यशवंत माने या दोन्ही नेत्यांनी मुस्ताक शेख यांच्या पाठपुराव्यामुळे वेळोवेळी निधी कमी पडू दिला नाही. त्यामुळे यापुढील काळातही या प्रभागाचे प्रतिनिधित्व मुस्ताक शेख यांनीच करावे अशी प्रभागातील सर्वसामान्यांची उत्कट इच्छा आहे. त्यामुळे अनेकांनी मुस्ताक शेख यांनीच ही निवडणूक लढवावीच अशी इच्छा व्यक्त केली आहे.
0 Comments