मेन्सवेअरचे सर्वाधिक व्हरायटी असलेल्या सुर्योदय सुटिंग शर्टींग फर्मला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
सांगोला (क.वृ):- सांगोला शहरात नव्याने सुरु झालेल्या सुर्योदय सुटिंग, शर्टींग फर्मच्यावतीने दिपावलीनिमित्त विशेष ऑफर देण्यात आल्या आहेत. या ऑफरला सांगोला शहर, परिसर व तालुक्यातील ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
नुकत्याच सुरु झालेल्या सुर्योदय सुटिंग शर्टींग फर्मकडून देण्यात आलेल्या ऑफरला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांनी चांगला प्रतिसाद देत शोरुममध्ये मोठी गर्दी केले असल्याचे सुर्योदय परिवाराचे सर्वेसर्वा अनिल इंगवले यांनी सांगितले.
दिपावली या मुहुर्तावर सांगोला तालुका व परिसरातील ग्राहकांना चांगल्या दर्जाचे सुटिंग शर्टींग खरेदी करता यावे यासाठी सुर्योदय सुटींग, शर्टींग हे वातानुकुलीत वस्त्रदालन उघडून या उद्योग समुहाने आणखी एका नवीन उद्योगात आत्मविश्वासाने पाऊल टाकले आहे. लिनन, कॉटन, सिल्क, रेमंड तसेच ड्रेसकोड, युनिफॉर्म व कितीतरी प्रकारचे सुटींग, शर्टींग आणि सुमारे दिड हजार प्रकारच्या व्हरायटी हे सर्व एकाच छताखाली उपलब्ध करुन दिलेल्या असल्यामुळे ग्राहकांनी गर्दी केली आहे.
तरी सुर्योदय सुटिंग शर्टींग फर्मला ग्राहकांनी भेट देवून सुटिंग शर्टींग खरेदी करुन चांदीचे नाणे फ्री ऑफर्सचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुर्योदय परिवाराच्यावतीने श्री.अनिल इंगवले, श्री.जगन्नाथ भगत, श्री.बंडोपंत लवटे, श्री.सुभाष दिघे यांनी केले आहे.
अगदी सर्वसामान्यांपासून सोलापूर- मुंबईला कपडे खरेदीसाठी जाणार्या ग्राहकांसह सर्वांसाठी उपयुक्त असे मेन्सवेअर उपलब्ध झाल्याने ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
0 Comments