कलाशिक्षक महासंघाची 'उपक्रमशील' दिवाळी

पंढरपूर (क.वृ.):- महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ जिल्हा सोलापूर यांच्यावतीने दिवाळीचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाउन मुळे शाळा बंद असल्यातरी कलाशिक्षक महासंघाने उपक्रमशीलता जपली असल्याचे मत प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष विनोद इंगोले, राज्य सरचिटणीस प्रल्हाद साळुंके, कोल्हापूर विभागीय कार्याध्यक्ष रामचंद्र इकारे, यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याच्या वतीने कवठेकर प्रशाला पंढरपूर येथील कलाशिक्षक अमित वाडेकर यांचे पर्यावरणपूरक आकाशकंदील व सुलाखे हायस्कूल बार्शी येथील कलाशिक्षक दीपक माने यांचे भेटकार्ड याविषयावर ऑनलाइन प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. या प्रात्यक्षिकाचा लाभ राज्यातील विविध भागातील कलाशिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी राज्यसरचिटणीस प्रल्हाद साळुंके यांनी कलाशिक्षक हा उपक्रमशील असतो. तो कला जिवंत ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत असतो. लॉकडाउन च्या काळातही आयोजित केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. यावेळी अमित वाडेकर व दीपक माने यांना राज्य कमिटीच्यावतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी प्रशासन अधिकारी तथा सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक अनिल बनसोडे यांनी कलाशिक्षक महासंघ करीत असलेल्या कार्याचे कौतुक करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी कोल्हापूर विभाग अध्यक्ष सुनील शिखरे ,कोल्हापूर विभाग उपाध्यक्ष सुहास पाटील, जिल्हा मार्गदर्शक राजेंद्र जाधव हे ही उपस्थित होते. कलाशिक्षक महासंघाच्यावतीने किल्ला बांधणी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सूत्रसंचालन व नियोजन जिल्हासचिव सावता घाडगे यांनी केले. तर आभारप्रदर्शन जिल्हा कोषाध्यक्ष शिवभूषण ढोबळे यांनी केले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अमित वाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष), नाथा लोंढे (जिल्हा उपाध्यक्ष) विशाल सरतापे (सहसचिव) , कार्यकारिणी सदस्य संतोष उपरे, सुहास गायकवाड, संतोष कदम, संदीप शाह, नितीन मिरजकर, महिला प्रतिनिधी रजनी चौरे, शोभा बिरादार, हरिदास कुंभार, प्रकाश दळवी यांच्यासह सर्व तालुका पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments