Hot Posts

6/recent/ticker-posts

इंजि मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ पुरुषोत्तम खेडेकर यांचा बुधवारी सोलापूर जिल्हा दौरा

इंजि मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ पुरुषोत्तम खेडेकर यांचा बुधवारी सोलापूर जिल्हा दौरा

करमाळा (क.वृ.): पुणे पदवीधर मतदारसंघातील संभाजी ब्रिगेड चे उमेदवार इंजिनिअर मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रचारार्थ मराठा सेवा संघ संस्थापक ऍड पुरुषोत्तम खेडेकर हे बुधवार 25 नोव्हेंबर रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेडच्या वतीने मेळावे, बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.त्यांच्यासोबत प्रदेश कार्याध्यक्ष प्रा अर्जुनराव तनपुरे हेही उपस्थित असतील.

बुधवारी सकाळी 9 वा सोलापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 11 वा बार्शी येथे पदवीधर मतदार व मराठा सेवा संघ पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक होणार आहे.दुपारी 1 वा  मोहोळ येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 वाजता पंढरपूर येथे बैठक संपन्न होईल.रात्री 8 वाजता सांगोला येथे पदवीधर मतदार व मराठा सेवा संघ कार्यकर्ते यांचा मेळावा होईल.

संभाजी ब्रिगेड राजकारणात सक्रिय झाल्यापासून ही पहिलीच पदवीधर निवडणूक असून संभाजी ब्रिगेड सर्व ताकदीने या निवडणुकीत उतरल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर ही निवडणूक संभाजी ब्रिगेड नक्की जिंकेल असा आत्मविश्वास मराठा सेवा संघ पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील,सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments