पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे हे दाखवून द्या - सुनील पाटील

करमाळा (क.वृ.): पुणे पदविधर,शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून देऊन विधानपरिषदेत पाठवा व राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महराष्ट्रतील बालेकिल्ला आहे हे दाखवून द्या असे आवाहन राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा पाटील यांनी केले आहे.महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड व जयंत आसगवकर यांच्या प्रचार दौऱ्यात राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यात कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शंभूराजे मोरे होते.यावेळी बोलताना शंभूराजे मोरे म्हणाले की जिल्ह्यात मतांच्या टक्केवारीत सोलापूर अव्वाल स्थानी राहणार आहे.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सरचिटणीस विशाल सूर्यवंशी,प्रदेश सदस्य नितीन झिंजाडे,जितेंद्र पाटील,अमित पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष विक्रांत पाटील,अतिष गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने,काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते कवी सुरेशकुमार लोंढे,करमाळा तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर,माढा तालुकाध्यक्ष संदीप गोरे,गोसावी,किसान सभेचे करमाळा तालुकार्याध्यक्ष सचिन नलवडे,सामाजिक न्याय विभागाचे करमाळा तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव,माढा तालुकाध्यक्ष अमोल कांबळे यासह वैभव लाड,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रा गोवर्धन चवरे आदी उपस्थित होते.
केंद्रात काँग्रेस राष्ट्रवादी चे सरकार होते तेव्हा टेंपररी कामगार कायम होत होते पण भाजप सरकारने तर कायम कामगारांना टेंपररी करणारे बिल संमत केले आहे याचा फटका थेट पदवीधरांना बसला आहे.यामुळे पदविधरांनी महाविकासआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे - नितीन झिंजाडे (प्रदेश सदस्य राष्ट्रवादी पदवीधर संघ)
0 Comments