Hot Posts

6/recent/ticker-posts

कार्तिकी वारी कालावधीत पंढरपुरात मांस विक्रीस बंदी - अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

कार्तिकी वारी कालावधीत पंढरपुरात मांस विक्रीस बंदी - अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

सोलापूर, (क.वृ.):  कार्तिक वारी कालावधीत आजपासून ते 27 नोव्हेंबर 2020 पर्यंत पंढरपूर शहरात मांसमासेमटण विक्री आणि प्राणी कत्तलीला अपर जिल्हादंडाधिकारी अजित देशमुख यांनी बंदी आदेश जारी केला आहे.

वारी कालावधीत सार्वजनिक शांततेचा भंग होऊ नयेशहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मांस विक्री व प्राण्यांची कत्तल करण्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 नुसार बंदी आदेश जारी केला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments