महादेव बहुद्देशीय संस्थेच्या वतीने निराधारांना दीपावली निमित्त फराळ वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 14, 2020

महादेव बहुद्देशीय संस्थेच्या वतीने निराधारांना दीपावली निमित्त फराळ वाटप

 महादेव बहुद्देशीय संस्थेच्या वतीने निराधारांना दीपावली निमित्त फराळ वाटप 

पंढरपूर, (क.वृ.): दीपावली सणानिमित्त पंढरपूरात विविध ठिकाणी आश्रयास असलेल्या अंध अपंग व निराधारांना महादेव बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

याबाबत संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र अभंगराव यांनी दिलेल्या माहिती नुसार दीपावली सण आपण आपल्या घरी आनंदाने साजरा करीत असताना समाजातील एक निराधार घटक थंडीवारा सहन करीत जीवन व्यतीत करीत असतो. मानवतेच्या दृष्टीने यांचीही दिवाळी गोड व्हावी या हेतूने आज फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी महादेव बहुद्देशीय संस्थेचे सचिव संतोष साळवे, माऊली काळे, मैनुद्द्दीन मणेरी, समाधान अधटराव, अनिल कांबळे, श्रीनिवास परदेशी, बाबू फिरगनाथ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages