टायगर ग्रुपच्या वतीने शहिद जवानांना वाहिली आगळी वेगळी आदरांजली - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 27, 2020

टायगर ग्रुपच्या वतीने शहिद जवानांना वाहिली आगळी वेगळी आदरांजली

 टायगर ग्रुपच्या वतीने शहिद जवानांना वाहिली आगळी वेगळी आदरांजली

संविधान दिन केला साजरा


सांगोला (क.वृ):- सामाजिक व इतर कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या टायगर ग्रुप व ग्रामस्थ कडलास ता-सांगोला यांच्या वतीने 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आणि संविधान दिनाच्या निमित्त मेणबत्ती प्रज्वलित करून आगळीवेगळी श्रद्धांजली वाहिली.या वेळी टायगर ग्रुपचे तालुकाध्यक्ष हनिभाऊ कांबळे, टायगर ग्रुपचे सर्व सदस्य,युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     या वेळी हनिभाऊ कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवानांनी आपल्या देशप्रेमाचे अभूतपूर्व दर्शन घडवून आपल्या देशाचे संरक्षण केले.आज त्या वीर शहीद जवानांमुळे आज आपण सुरक्षित आहोत,येणाऱ्या काळातही टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून देशप्रेम जागृत करण्यासाठी प्रयत्न करील, असे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला अर्पण केलेले संविधान श्रेष्ठ असल्याची भावना व्यक्त केली.या वेळी टायगर ग्रुपचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages