स्थानिक पातळीवरील मतभेद विसरून सर्वांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊया- ज्ञानेश्वर कोळसे पाटील
सांगोला (क.वृ):- काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतर मित्रपक्ष यामधील स्थानिक पातळीवर असलेले मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकदिलाने महाविकास आघाडीच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर उमेदवारांना पसंती क्र 1 चे मत नोंदवा आणि प्रचंड बहुमताने निवडून देऊया असे आवाहन जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी केले आहे. महाविकास आघाडी तर्फे शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रा जयंत आसगावकर तर पदवीधर प्रतिनिधी म्हणून अरुण लाड विधान परिषदेच्या रिंगणात आहेत.सावित्रीबाई फुले शिक्षण संकुल,सोनंद चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांनी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष पदाची जबाबदारी खांद्यावर घेऊन शिक्षकांचे गट करून तालुक्यातील शाळांना भेट देत आहेत. प्रचाराचा एक भाग म्हणून त्यांनी महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव व इतर शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांचेशी संवाद साधला, त्यांचे बरोबर महाविकास आघाडीतील पदाधिकारी व शिक्षक प्रचार यंत्रणेत आहेत. मा आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या शी संपर्क साधत आणि काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या समन्वयाने ते तालुकभर प्रचार यंत्रणा राबवत आहेत.
0 Comments