कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांसाठी सांगोला नगरपरिषदेकडुन 'पीएम स्वनिधी' योजनेची प्रभावी अंमलबजावणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 12, 2020

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांसाठी सांगोला नगरपरिषदेकडुन 'पीएम स्वनिधी' योजनेची प्रभावी अंमलबजावणी

कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पथविक्रेत्यांसाठी सांगोला नगरपरिषदेकडुन 'पीएम स्वनिधी' योजनेची प्रभावी अंमलबजावणी


आज अखेर 58 पथविक्रेत्यांच्या खात्यावर प्रत्येकी 10 हजार प्रमाणे एकूण 5.8 लाख जमा

सांगोला दि.१२(क.वृ.): लॉकडाऊन काळात मोडकळीस आलेल्या पथ विक्रेत्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू होऊन त्यांची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसावी या उद्देशाने सुरू केलेल्या केंद्र पुरस्कृत "पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्भर निधी (पीम स्वनिधी)" योजनेची शहरात सांगोला नगरपरिषदेकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्त्यांना दहा हजार रुपये खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून दिले जात असून शहरातील जास्तीत जास्त पथ विक्रेत्यानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन काळात डबघाईस आलेल्या पथ विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत पंतप्रधान पथ विक्रेता (आत्मनिर्भर निधी) या योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या हेतूने पथ विक्रेत्यांना विशेष सूक्ष्म पतपुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला असून बँकेच्या सहाय्याने अशा पथ विक्रेत्यांना विनातारण दहा हजार रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिले जात आहे. या पथविक्रेत्यांमध्ये  भाजी,फळे,चहा,कापड विक्रेते, टोपल्या बनविणारे छोटे व्यावसायिक,तयार खाद्यपदार्थ ,भजी वडापाव, अंडी ,चप्पल, पुस्तके, स्टेशनरी, केशकर्तनालय, चर्मकार, पान दुकान, लॉंड्री दुकान यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महा ई सेवा केंद्रातून ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. दि. 12 ऑक्टोबर 2020 अखेर सांगोला शहरातील सुमारे 189 शहरी फेरीवाल्यांनी अर्ज केले होते त्यापैकी 78 व्यक्तींचे अर्ज प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ़ इंडिया, स्टेट बँक ऑफ़ इंडिया, युनियन बँक ऑफ़ इंडिया शाखा सांगोला यांनी मंजूर करून त्यापैकी *58* लाभार्थीच्या खात्यात दहा हजार रुपये प्रमाणे 5 लाख 80 हजार रुपये एवढी कर्ज रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

कर्जाची नियमित परतफेड केल्यास सात टक्के व्याजात सूट व पुढे मोठे भांडवली कर्ज देण्यात येईल तसेच लाभार्थीने डिजिटल व्यवहार केल्यास कॅशबॅक ऑफर देखील दिली जाणार आहे. या अनुषंगाने दि. 12 ऑक्टोबर 2020 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र यांनी मंजूर केलेल्या 19 लाभार्थाना लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, मुख्याधिकारी श्री. कैलास केंद्रे यांच्या हस्ते मंजुरी पत्र देण्यात आले. 

याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणामध्ये बोलताना मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले की, " पीम स्वनिधी योजना ही कोरोना काळामध्ये व्यवसाय मोडकळीस आल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या छोट्या पथविक्रेत्यांसाठी  नवसंजाविनी देणारी योजना आहे. त्यामुळे शहरातील जास्तीत जास्त पथविक्रेत्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.राणीताई माने यांनी देखील उपस्थित पथविक्रेत्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या सहकारी पथविक्रेत्यांना ही या योजनेची माहीती देण्याचं व या योजनेचा लाभ घेऊन कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्याच आवाहन केलं. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक सुजित कुमार, सांगोला नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधीक्षक अभिलाषा निंबाळकर, सहा. प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे व नगरपरिषद कर्मचारी देखील उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages