Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग येथे मनसेचे 'पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर' संपन्न

नळदुर्ग येथे मनसेचे 'पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर' संपन्न

तुळजापूर दि.१२(क.वृ.): तुळजापूर तालुक्यातील येथील रामतिर्ध देवस्थान परिसरातील सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 'पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर' संपन्न झाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी नळदुर्ग येथे, तुळजापूर, उमरगा व लोहारा तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्यांसाठी, 'पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर' आयोजित केले होते. यासाठी प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष मा.दिलीप (बापू) धोत्रे हे उपस्थित होते.

धोत्रे यांनी पक्षसंघटन, पक्षशिस्त,  आंदोलने, निवडणूका आदी विषयांवर उपस्थित पदाधिकार्यांना  सखोल मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंखे, महेश जाधव, जिल्हासचिव ज्योतिबा येडगे, उमरगा तालुकाध्यक्ष हरी जाधव, नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख यांनीही यावेळी आपले विचार मांडले. या शिबिरासाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, उपजिल्हाध्यक्ष अविनाश साळुंखे, महेश जाधव,जिल्हासचिव ज्योतिबा येडगे,विश्वनाथ स्वामी,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मयुर गाढवे, लोहारा तालुकाध्यक्ष अतुल जाधव,तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार, उमरगा तालुकाध्यक्ष हरी जाधव, लोहारा तालुकासंघटक अजय पवार,  जनहिताचा कक्षाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष ॲड.मतिन बाडेवाले,नळदुर्ग शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी, उमरगा शहराध्यक्ष हेमंत बनसोडे यांच्यासह उमरगा, लोहारा व तुळजापूर तालुक्यातील मनसे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments