अनगरमध्ये लोकनेते हेल्थ क्लबचे उदघाटन

तरुणांनी हेल्थ क्लबचा वापर करून शरीर निरोगी, सदृढ ठेवत स्वतःची प्रतीकार शक्ती वाढवावी - आमदार यशवंत माने
मोहोळ दि.१२(क.वृ.): आपले शरीर अशी सर्वात मोठी संपत्ती आहे. ही बाब ओळखूनच माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनगर ग्रामपंचायतीने अत्याधुनिक असा लोकनेते हेल्थ क्लब सुरू केला आहे. लोकनेते हेल्थ क्लबचा वापर तरुणांनी करून आपले शरीर निरोगी, सदृढ ठेवून शरीरातील प्रतीकारशक्ती वाढवावी असे आवाहन आमदार यशवंत माने यांनी केले. अनगर ग्रामपंचायतीने १४ व्या वित्त आयोगातून गावातील तरुणांसाठी अत्याधुनिक, सुसज्य अशा लोकनेते हेल्थ क्लबची गांधी चौक येथे उभारणी केली असून त्याचे उदघाटन आमदार यशवंत माने यांनी माजी आमदार राजन पाटील, लोकनेते शुगरचे चेअरमन तथा जि.प. सदस्य बाळराजे पाटील यांच्या उपास्थितीत केले. त्या प्रसंगी आ.माने बोलत होते.
प्रारंभी आमदार यशवंत माने, गटविकास अधिकारी गणेश मोरे यांनी लोकनेते(स्व.) बाबुराव( अण्णा) पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहून पुजन करून क्लबमधील व्यायाम साहित्यावर व्यायामाचा सराव केला. याप्रसंगी माजी आमदार राजन पाटील यांनी गावच्या सर्व धर्म, सर्व समाज बांधवांनी एकीचे बळ पाटील परिवाराच्या मागे उभे केल्याबद्दल ग्रामस्थांबद्दल आदर व्यक्त केला.
याप्रसंगी रामचंद्र क्षिरसागर, दीपक माळी, अस्लम चौधरी, अनिल कादे, अमर मुलाणी, संकेत गवसणे, सचिन कदम, जयसिंग गुंड, हरि गुंड, कैलास मोरे, श्री.वेदपाठक, रविंद्र पाचपुंड, आप्पा माने, शहाजी गुंड, वामन माने,नारायण गुंड, गणेश पावले, रुपेश ऐतवाडे, महेश टिंगरे, जाधव आदी उपास्थित होते. प्रा.सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
0 Comments