Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला नगर परिषदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

सांगोला नगर परिषदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी


सांगोला, दि.२(क.वृ.): आज दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी सांगोला नगर परिषदे मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 151 वी व लालबहादूर शास्त्री यांची 116 वी जयंती  माननीय नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांच्या हस्ते  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून इनरव्हील क्लब सांगोला यांच्यावतीने सांगोला नगरपरिषदेच्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना झाडू व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सांगोले नगरपरिषदेच्या माननीय नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, आरोग्य सभापती छायाताई मेटकरी,  इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा व माजी नगराध्यक्षा शुभांगी पाटील व सहकारी तसेच नगरपरिषदेच्या कार्यालयीन अधिक्षक अभिलाषा निंबाळकर, आरोग्य निरीक्षक संजय दौंडे  व नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments