गांधी जयंती निमित्ताने हमालांना मास्क व सँनिटायझर वाटप

तुळजापूर दि.२(क.वृ.): तुळजापूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री विजयकुमार गंगणे यांच्या तर्फे बाजार समितीमधील हमाल बांधवांना महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन मास्क, सॅनिटायझर, अर्सेनिकम अल्बम 30 गोळयांचे वाटप वाटप करण्यात आल्या.
बाजार समितीचे सभापती श्री विजयकुमार गंगणे यांचे तर्फे कृषि उत्पन्न बाजार समितीचे मार्केट यार्डातील कार्यरत हमाल बांधवांना आज रोजी मास्क, सॅनिटायझर व अर्सेनिकम अल्बम 30 गोळया इत्यादी साहित्याचे किट मा. उमेश भोपळे सचिव कृउबास तुळजापूर, बाजार समितीचे माजी संचालक श्री संतोष कदम, जेष्ठ आडत व्यापारी श्री बागल साहेब, मनोज गवळी व इतर मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. आ. राणाजगजितसिंह पाटील विनोद गंगणे यांच्या संकल्पनेतुन हा उपक्रम राबविण्यात आला.
तसेच मा. सभापती यांचे मार्गदर्शनाखाली यापुर्वी बाजार समितीचे वतीने बाजार आवारातील हमाल, व्यापारी यांना मास्क सॅनिटायझर, मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये रक्कम रु. 59051/- बाजार आवारातील एकुण 70 हमाल बांधवांनवा जीवनावश्यक किराणा साहित्याचे किट, समाजातील गोरगरीब व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी किराणा साहित्याचे एकुण 500 किट मा. तहसिल कार्यालय यांचेकडे जमा केलेले असून बाजार समिती, अडत व्यापारी संघटनपा, विजयकुमार गंगणे मित्र मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने गोरगरीब जनतेसाठी वेळोवळी किराणा साहित्य किट, गहु, तांदुळ इत्यादी अन्नधान्य, मस्क सॅनिटायझर इत्यादी साहित्य वाटप करण्यात आलेले असल्याचे सचिव श्री उमेश भोपळे यांनी सांगितले. यावेळी बोलताना सभापती श्री गंगणे यांनी गोर गरीब व वंचित घटकांचे मदतीसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगून गोर गरीब जनतेसाठी आणखीही शक्य तेवढी मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही यावेळी दिली.
याप्रसंगी बाजार समितीचे सचिव श्री उमेश भोपळे, सह सचिव श्री कुलदीप पवार, माजी संचालक श्री संतोष कदम, अडत व्यापारी संघटनेचे श्री बागल साहेब, त्याचप्रमाणे विजयकुमार गंगणे मित्रमंडळाचे श्री मनोज गवळी, विवेक तांबे, तोलार योगेश चौधरी यांचेसह व्यापारी, हमाल, व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments