महात्मा गांधी यांना गांधी फोरम तर्फे विनम्र अभिवादन..

सोलापूर, दि.२(क.वृ.): राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गांधी फोरम तर्फे रेल्वे स्टेशन जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी निर्मलाताई ठोकळ यांनी आपले मत व्यक्त करताना महात्मा गांधीजींच्या अहिंसा , सत्य, अस्तेय व अपरिग्रह या तत्वांचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी गांधी फोरमचे राष्ट्रीय प्रभारी अध्यक्ष पुरूषोत्तम बलदवा, राष्ट्रीय सचिव नंदकुमार यल्ला , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस उपेंद्र ठकार, शहर उपाध्यक्ष रमाकांत साळुंखे शहर सचिव प्रा.गणेश लेंगरे तसेच गांधी फोरमचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते.
0 Comments