Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई, दि.२(क.वृ.): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जंयतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अभिवादन केले.

मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार, जगाला सत्याग्रहाचा मार्ग दाखवून देणाऱ्या महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा आणि मानवता या मूल्यांसाठी आयुष्य वेचले. महात्मा गांधी यांचे विचार चिरकाल टिकणारे आहेत. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी राष्ट्राभिमान जोपासताना साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा वस्तूपाठ घालून दिला. 'जय जवान जय किसान' ही घोषणा त्यांनी कृतीतूनही सिद्ध केली. या दोन्हीही सुपूत्रांनी भारताला एक राष्ट्र म्हणून ओळख मिळवून देण्यात आणि राष्ट्र उभारणीत दिलेले योगदान अतुलनीय असेच आहेत. विश्ववंद्य महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.

Reactions

Post a Comment

0 Comments