Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय औषधीय शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (NIPER-JEE- 2020) परिक्षेत सहयाद्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

राष्ट्रीय औषधीय शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (NIPER-JEE- 2020) परिक्षेत सहयाद्री फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश

सांगोला, दि.२(क.वृ.): राष्ट्रीय औषधीय शिक्षा एवं अनुसंधान संस्थान (NIPER-JEE- 2020) परिक्षेत महाविद्यालयाचा बी. फार्मसी चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी चि. उमेश महादेव कोरे हा राष्ट्रीय स्तरावर 1320 क्रमांक घेऊन विशेष प्राविण्यासहीत उत्तीर्ण होऊन राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षीच्या पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र (M. Pharmacy) या अभ्यासक्रमास केंद्र शासनामार्फत विशेष शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले जाते.

या उत्तीर्ण विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलिपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाने या परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना नामवंत व तज्ञांचे मार्गदर्शनपर विविध व्याख्याने आयोजीत केले होते. महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापक व महाविद्यालयाने आयोजिलेल्या विविध मार्गदर्शन पर व्याख्याने, शैक्षणिक वातावरण व सुविधा यामुळेच आम्ही या परिक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मोलाची मदत झाली असे उत्तीर्ण विद्यार्थ्यांने मनोगतात मत व्यक्त केले.

Reactions

Post a Comment

0 Comments