महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात आली

सोलापूर, दि.२(क.वृ.): महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षसंवर्धन बार्शी आणि जाणीव फाऊंडेशनच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी बार्शी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सौ.अमिता दगडे पाटील याही उपस्थित होत्या. आज सकाळी सात वाजता या स्वच्छता मोहीमेला शुभारंभ झाला. या स्वच्छता मोहिमेत जवळजवळ पन्नास सदस्यांनी सहभाग घेऊन तेथील सर्व परिसर स्वच्छ केला. सुरुवातीला पाटील मॅडम यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या फोटोला पुष्पहार घालून त्यांना वंदन करण्यात आले. यावेळी बोलताना सौ. पाटील यांनी जाणीव फाऊंडेशनच्या कामाचे कौतुक केले तसेच येणाऱ्या काळात जाणीव फाऊंडेशनच्या वैकुंठ भूमी सुशोभीकरणात व वृक्षसंवर्धन समितीच्या कार्यात आपण देखील सहभागी होऊ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. पाटिल मॅडम यांचा झाड देवुन सत्कार करण्यात आला.
यावेळी गेले पंधरा दिवसांपासून हा परिसर स्वच्छ करणारे ऍड. आनंद मस्के यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी वसंतमामा हवालदार, संतोष पवार सर, उमेश काळे, सचिन शिंदे, संपतराव देशमुख, फपाळवाडी चे सरपंच काका फफाळ, दिपक तलवाड, प्रफुल्ल गोडगे, बाबासाहेब बारकुल, पवन खरसडे, राणा देशमुख, संतोष मस्के, किरण लुंगारे, दिपक जाधव, नाना मारकड, दिपकनाना शिंदे, राजभाऊ नवगन, आप्पा साळुंके, अक्षय भुईटे, अक्षय घोडके, सौदागर मुळे, सागर लाकाळ, संतोष काका मस्के आदी उपस्तिथ होते.
0 Comments