Hot Posts

6/recent/ticker-posts

अचकदाणी ग्रामपंचायत लाखो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सरपंच,ग्रामसेवक आणि शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करावी-विजय पाटील

 अचकदाणी ग्रामपंचायत लाखो रुपयांचा घोटाळा करणाऱ्या सरपंच,ग्रामसेवक आणि शाखा अभियंता यांच्यावर कारवाई करावी-विजय पाटील

शाखा अभियंता हरवले कर्तव्याचे भान कारण त्यांना लागले टक्केवारीचे ग्रहण

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) आचकदाणी-ता सांगोला या ग्रामपंचायतीने सोलापूर जिल्हा सेस फडातून मंजूर करून आणलेल्या आचकदाणी ग्रामपंचायत अंतर्गत ठोंबरेवाडी येथील अंगणवाडी बांधकामाला चिरा पडायला लागल्या असून  दीड वर्षातच ठोंबरेवाडी येथील अंगणवाडी भिंतीला भेगा पडायला सुरुवात झाली आहे. भविष्यात ही अंगणवाडी ढासळण्याचा जास्त धोका असून शासकीय अनुदान लाटून सरपंच,ग्रामसेवक आणि शाखा अभियंता मात्र गलेलठ्ठ झाले आहेत, अशा पैसे खावू प्रतिनिधी आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, अशा प्रतिनिधी आणि शासकीय कर्मचाऱ्याच्या  व आचकदाणी ग्रामपंचायतीने केलेल्या कामाची चौकशी करावी,अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी केली आहे.

         पुढे बोलताना विजय पाटील म्हणाले की,अचकदाणी ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून केलेल्या कामात  लाखो रुपयांचा भष्ट्राचार झाला आहे.बेंदवस्ती येथील प्राथमिक शाळेच्या तार कपौंडचे काम निकृष्ट झाले असून एका वर्षातच हे तार कम्पोऊंड सर्वत्र उचकटून पडले आहेत. पेव्हिंग ब्लॉगच्या कामात ही सरपंच,ग्रामसेवक आणि अकार्यक्षम शाखाअभियंता मुळीक यांनी ठेकेदारा बरोबर आर्थिक मिलीभगत करून पेव्हिंग ब्लॉग व तार कम्पोऊंड चे काम निकृष्ट दर्जाचे होत असताना "झोपेचे सोंग घेतले आणि कामाचे बिल मात्र तक्रार असताना लगेच मंजूर करून काढून दिले.हे करताना शाखा अभियंता असणारे मुळीक यांनी मात्र कामाचा दर्जा,गुणवत्ता यांच्याकडे कानाडोळा केला आणि याच मुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी निकृष्ट दर्जाच्या कामात वाहून गेला,असा आरोप विजय पाटील यांनी केला आहे.रस्ते,पेव्हिंग ब्लॉक,तार कम्पोऊंड आदि कामे ग्रामपंचायत स्तरावर होत असताना त्या बांधकामाची गुणवत्ता,दर्जा शाखा अभियंता तपासत असतात. मात्र या कामाच्या बाबतीत शाखा अभियंता  या कामाचा दर्जा, गुणवत्ता विसरले कारण त्यांना लागले टक्केवारीचे ग्रहण अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.

        जिल्हा परिषदे कडून मंजूर होणाऱ्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्ट्राचार करणाऱ्या आणि ठेकेदाराला पाठीशी घालून लाखो रुपयांचा मलिदा खाणाऱ्या शाखा अभियंता ,सरपंच,आणि ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काळात आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी युवा सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी दिला आहे.

 या सर्व कामाबद्दल गावचे सरपंच वसंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,त्यांचा मोबाइल नॉट रीचेबल दाखवत होता.

Reactions

Post a Comment

0 Comments