अर्धवट बायपास रस्तामुळे होतायत अपघात

तुळजापूर दि.१९(क.वृ.): शहर परिसरात असणाऱ्या उस्मानाबाद - लातूर बायपास रस्ता वर असणाऱ्या तडवळा शिवारालगत चालु असलेल्या बायपासच्या रस्त्यावर कामावर विचित्र अपघात घडला सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही बायपास रस्त्याचे काम अर्धवट राहिल्याने हा विचिञ अपघात घडला आहे हा बायपास रस्ता तडवळा पंचक्रोषीत असणाऱ्या शेतकरी व गावचा मुळावर आले आहे. श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव पार्श्वभूमीवर शहरात बाहेरील खाजगी वाहनांना शहरात प्रवेश नसल्याने सोलापूर उस्मानाबाद येथील सर्व वाहन उस्मानाबाद - लातूर बायपास रस्त्यावरून सोडले जात आहेत.
या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत,असल्याने सध्या या रस्त्यावर अपघात होत आहेत असाच ऐक विचिञ अपघात रविवार दि १८रोजी घडला. रस्ता काम चालु असुन येथे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. व समोर विहीर असल्याने तेथे मुरूम टाकला आहे त्या ठिकाणी कुठल्याही दिशा फलक लावण्यात आला नाही यात विस्टा कंपनीची एम. एच. १० ए. ई. ७८३७ या नंबरची गाडी त्या मुरूम ढिगा-यास धडकून पलटी झाली यामुळे एक जण जखमी झाला ही गाडी वेळीच न हलवल्यामुळे के ए.५६ एम.१२४७ या नंबरची गाडी त्याला ठोकून निघून गेली त्यानंतर दिनांक १९ सोमवार रोजी पहाटे ५:३० सुमारास फॉल्ट कंपनीची एम एच २४ ए.ई.२०१६ ही गाडी पहिल्या गाडीला धडकली व गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रस्त्याचे काम वेळेवर न झाल्यामुळे हा विचित्र अपघात घडला सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. संबंधित कंपनी व अधिकारी राहिलेल्या कामाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे असे अपघात घडत आहेत.
0 Comments