Hot Posts

6/recent/ticker-posts

बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसाठी दहा दिवस शुध्द पाण्याची सोय

बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसाठी दहा दिवस शुध्द पाण्याची सोय

तुळजापूर, दि.१९(क.वृ.): श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सव मधे बंदोबस्त साठी आलेल्या पोलीस बांधवांना आनंद दादा कंदले मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येक चेकपोस्ट येथे शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. शारदीय नवरात्र उत्सव 2020 मधे जिल्ह्यातील अनेक पोलीस तुळजापुर शहरात आलेले आहेत, शहरातील अनेक ठिकाणी छावणी करुन ते शहर सुरक्षे साठी उभे आहेत, त्यांना जागेवर दररोज शुद्ध पाणी आनंद (दादा) कंदले मित्र मंडळाच्या वतीने पुढील 10 दिवस देण्यात येणार आहे, याचा शुभारंभ आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छावणीत समोर करण्यात आला.

यावेळी पोलीस निरिक्षक श्री हर्षवर्धन गवळी साहेब, आनंद दादा कंदले, सहा. पोलीस निरिक्षक राठोड साहेब, सहा पोलीस निरिक्षक चव्हाण साहेब, पोलीस उपनिरीक्षक रोटे साहेब, शांतीलाल घुगे, विशाल तिकोने, सोमनाथ देवकर व मित्र मंडळ सहकारी उपस्थिती होते.

Reactions

Post a Comment

0 Comments