स्ञी पुरुष शेतकऱ्यांनी मांडल्या राजेंसमोर व्यथा ; टँक्टर मधुन केली पाहणी


मदती बाबतीत केंद्राशी बोलणार छञपती संभाजी राजे
तुळजापूर दि.१९(क.वृ.): अन्नधान्य वाहुन गेले खायच काय ? द्राक्षबागा कांदा गेला आता करायाच काय! जमिनी खंगाळुन गेल्या जगायचे कसे या सह अनेक शेतकऱ्यांनी राजेसंभाजी यांच्या समोर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान ची पाहणीसाठी छत्रपती संभाजी राजे आले असता पुरुष महिला शेतकऱ्यांनी व्यथा मांडल्या यावेळी संभाजी राजेनी थेट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जावुन अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान पाहणी केली. यात आपसिंगा येथे तर शेतात जाण्यासाठी रस्त नव्हता तिथे दीड कीलोमीटर टँक्टर मधुन नंतर चिखलातुन शेतात जावून नुकसान पाहणी केली.
पाहणी नंतर बोलताना छञपती संभाजी राजे म्हणाले की, तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन यात छञपती संस्थानचा जमिनीना ही, अतिवृष्टीचा फटका बसला आहे छञपतींना नुकसान भरपाई नको ; पण उर्वरीत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा मदत बाबतीत मी केंद्राला बोलतो गोरगरीब शेतकऱ्यांना माञ मदत गरजेची असल्याने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी मी शाषणाकडे करणार असल्याचे स्पष्ट केले.
सकाळी 8:30 वाजता तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथुन पाहणीस आरंभ केला नंतर सिंदफळ येथे आले असता ऐकामहिलेने इमाचे अन्नधान्य वाहुन गेले घर पडयला झाले आता खायला काही नाही असे सांगताच प्रशाषणाला सांगुन तुम्हाला अन्नधान्य देण्याची व्यवस्था करतो असे सांगुन सदरिल महिलेला दिला दिल तर आपसिंगा येथे शेतकरी युवराज पाटील यांच्या शेतात टँक्टर मधुन जावून पाहणी केली.
यावेळी अनेक बागायत दार शेतकऱ्यांनी रडकुंडीला येवुन आमचा द्राक्षबागा गेल्या कांदा गेला आमचे लाखो रूपयाचे नुकसान झाल्याचे सांगितले तुमच्या कडेशमी विशेषा लक्षदेईन असे यावेळी सांगुन त्यांना दिला. तसेच काञी कामठा येथेही जावुन पंचकृषी अनेक गावात जावून नुकसानीची पाहणी केली. यावेळी रोहित पडवळ, सुजित जमदाडे, शरद जमदाडे, सह अनेक शेतकरी उपस्थितीत होते.
0 Comments