Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालय खाजगी दलालांनी वेढले : अधिक्षक, उपअधीक्षक मात्र 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' च्या भूमिकेत

सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालय खाजगी दलालांनी वेढले : अधिक्षक, उपअधीक्षक मात्र 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' च्या भूमिकेत



भूमी अभिलेख कार्यालयात 'रात्रीस खेळ चाले' प्रमाणे मध्यरात्री पर्यंत खाजगी दलालामार्फत चालत आहे कामकाज

सांगोला दि.१२(क.वृ.): सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कारभार हा मनमानी चालत असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सर्व सामान्य नागरिकांना या कार्यालयातील एजंटगिरीचा वाईट अनुभव येत आहे.मात्र या कार्यालयातील अधिक्षक आणि उपअधिक्षक मात्र  एजंटाना सहकार्याची भूमिका दाखवत असल्याने खाजगी एजंट मात्र या कार्यालयातील अधिकाऱ्यांपेक्षा मुजोर झाल्याचे चित्र दिसत आहे, एवढे असताना वरिष्ठ अधिकारी मात्र 'तेरी भी चूप मेरी भी चूप' च्या भूमिकेत  दिसत आहेत.सर्वसामान्यांना मात्र  वरिष्ठ अधिकारी या कार्यालयातून खाजगी एजंटाना हद्दपार करणार का? असा प्रश्न  पडला आहे.

सांगोला येथील भूमी अभिलेख कार्यालय हे सर्वात जास्त नागरिकांच्या तक्रारी असणारे कार्यालय असल्याची भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.या कार्यालयातील कर्मचारी खाजगी एजंटाना घेवून कार्यालयीन कामाच्या वेळी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत कामकाज करीतअसल्याचे दिसून येत आहे. हे खाजगी दलाल मात्र आर्थिक मलिदा घेतल्याशिवाय कामच करीत नसल्याचे अनेकांनी सांगितले आहे. हे एजंट मात्र अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक मांडवली करून सर्वसामान्यांना लुटत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.

हे खाजगी दलाल स्वतः अधिकारी असल्याची भूमिका घेत आहेत. शासकीय कर्मचाऱ्याच्या खुर्ची वर बसून हे दलाल काम पाहत आहेत. सामान्य नागरिकांचे अनेक वेळा हेलपाटे मारून देखील या कार्यालयात कामे होत नाहीत, परंतु धनदांडग्या लोकांशी आर्थिक तडजोडी करून सर्रास पणे त्यांची कामे केली जात आहेत,असा आरोप अनेक नागरिकांनी केला आहे. सिटी सर्व्हे उताऱ्यावरील नोंदी परस्पर तडजोडी करून खाजगी दलाल ला मध्यस्थी करून कोणत्याही प्रकारे स्थानिक चौकशी न करता वारसांना नोटीस न देता आर्थिक तडजोडी करून बेकायदेशीर रित्या दलालाच्या हस्ताक्षरानेच  नावे नोंदवली जात आहेत. अनेक तक्रारी असून देखील वरिष्ठ अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत. आशा बेकायदेशीर केलेल्या कामाचा जाब विचारले असता मुजोरी आणि अर्वाच्च भाषेत उत्तरे दिली जातात.या पुढे जावून अपील करा,कोर्टात जावा अशी उडवा उडवीची उत्तरे देतात. आपल्या फायद्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून खाजगी दलाला हाताशी धरून ही कामे केली जात आहेत. मोजणी झाल्यानंतर अनेक प्रकरणे  गायब होत आहेत. याची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. ऑफिस मध्ये नियुक्ती असणारे कर्मचारी मोजणी साठी बाहेर फिरत असतात. अशी अनेक कामे करण्यासाठी दिवस कमी पडत असल्याने रात्रीचे गुपचूप काम चालत आहे.

रात्री अंधारात केलेली कामे कसली असतात हे सांगण्याची आवश्यकता आहे ? का असा संतप्त सवाल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे. वरिष्ठांकडून अशा कामामध्ये ज्या कर्मचारी व अधिकाऱ्याचा  समावेश आहे त्यांची खाते निहाय चौकशी व्हावी,अशी  नागरिकांतून मागणी होत आहे.

  1. मोजणी झालेली प्रकरणे अचानक गायब केली जातात. ऑफिस मध्ये नियुक्ती असणारे कर्मचारी मोजणी साठी बाहेर जातात.आपल्या जागी खाजगी व्यक्ती बसवतात. सामान्य नागरिकांची व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात आहे. ह्याची खाते निहाय चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी - मोहसीन तांबोळी (जि. कार्याध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस अ. विभाग)
  2. कार्यालयात घेऊन गेलेल्या कामासाठी कर्मचारी कधी जागेवर उपलब्ध नसतात. मध्यस्था मार्फत काम करून घ्यावे लागते. मोठ्या प्रमाणात नागरिकांचीआर्थिक पिळवणूक केली जात आहे. बेकायदेशीर पणे नोंदी केल्या जात आहेत.ह्याची खाते निहाय चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी - कादिर इनामदार (शहर अध्यक्ष-ओ. बी.सी संघटना)
Reactions

Post a Comment

0 Comments