सांगोला भाजप महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 12, 2020

सांगोला भाजप महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

सांगोला भाजप महिला आघाडीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

सांगोला दि.१२(क.वृ.): महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. असंवेदनशील असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने याबाबत कोणतेही पाऊल न उचलल्यामुळे सांगोल्यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करीत तहसीलदार, पोलिस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग, हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. कोरोनाच्या काळात कोविड सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. आघाडी सरकार महिलाच्या सुरक्षिततेबाबत निष्क्रिय ठरले आहे. महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजप महिला आघाडीच्या वतीने तहसीलदार योगेश खरमाटे, पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य  राजश्री नागणे, जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस शितल लादे, शिवाजीराव गायकवाड, गजानन भाकरे, मानस कमलापुरकर, एन.वाय.भोसले, वसंत सुपेकर, वैजयंती देशपांडे, प्रिया कमलापुरकर, वैशाली भोसले, मनीषा मिसाळ, सुवर्णा कांबळे, आशा लिगाडे, संगीता चौगुले, अर्चना खर्चे, सुनिता गडहीरे,  आकांक्षा चौगुले, अर्चना सुर्यागण यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी, सदस्या उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages