अवैध धंद्या विरुद्ध सह्यांच्या मोहिमेला कॉ.गोदूताई परुळेकर वसाहत येथे सुरुवात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2020

अवैध धंद्या विरुद्ध सह्यांच्या मोहिमेला कॉ.गोदूताई परुळेकर वसाहत येथे सुरुवात

 अवैध धंद्या विरुद्ध सह्यांच्या मोहिमेला कॉ.गोदूताई परुळेकर वसाहत येथे सुरुवात


नागरिकांनी ही मोहीम यशस्वी करावी- विक्रम कलबुर्गी

सोलापूर, दि.५(क.वृ.):- शहरी आणि ग्रामीण भागाला लागलेली अवैध धंदे आणि व्यसनाची कीड कायमची काढण्यासाठी जनतेने प्रत्यक्ष सहभाग नोंदवणे आवश्यक आहे. केवळ तक्रार करून चालत नाही तर यासाठी जनतेच्या सोबत ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांनी केले.

सोमवार दि.५ ऑक्टोबर रोजी तालुका दक्षिण सोलपूर मौजे कुंभारी कॉ.गोदूताई परुळेकर वसाहत अ ब क परिसरात वसाहतीचे प्रभारी कॉ.विल्यम ससाणे यांच्या प्रमुख  उपस्थितीत युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष कॉ विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली 1 लाख सह्यांच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहीम कुंभारी, वळसंग, अ.कोट दक्षिण सोलपूर परिसरात ही राबविण्यात येणार आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यातील  अवैध धंद्यावर आळा घाला, युवकांना नौकरी अथवा बेरोजगार भत्ता द्या, मायक्रो फायनान्स व बचत गटाचे लॉकडाऊन काळातील हप्ते पूर्णपणे माफ करा, विषारी ताडी, मटका, खाजगी सावकारी, बारबाला, जुगार अड्डे बंद करा, ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे गरीब विद्यार्थ्यावर होणारा अन्याय दूर करा, नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या अशा सर्व जनतेच्या न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन एक लाख सह्यांची मोहीम राबवत असल्याची माहिती जनतेला देण्यात आली.

यावेळी ही मोहीम यशस्वी होण्यासाठी जिल्हा सचिव अनिल वासम, खादर शेख, विजय हरसुरे मधुकर चिल्लाळ, प्रभाकर गेंट्याल, अप्पाशा चांगले, विनायक भैरी,दिनेश बडगू, नरेश गुल्लापल्ली,जैद मुल्ला, नवनीत अंकम,नानी माकम,योगेश आकीम आदी युवा महासंघाचे कार्यकर्ते व  बापू साबळे, हसन शेख आकीम वसीम देशमुख आदीनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages