Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकिरण चव्हाण यांना ‘टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ जाहीर

राजकिरण चव्हाण यांना ‘टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०’ जाहीर

सोलापूर, दि.५(क.वृ.): स्टेट इनोव्हेशन ॲण्ड रिसर्च फाऊंडेशन (सर फाऊंडेशन), महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सर फाऊंडेशन टीचर इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड २०२०' तंत्रस्नेही शिक्षक राजकिरण चव्हाण यांना जाहीर झाला आहे.

सर फाऊंडेशनने शिक्षण विषयक अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. रवि जे मथाई सेंटर फॉर एज्यूकेशनल इनोव्हेशन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, हनी बी नेटवर्क, सृष्टी अहमदाबाद, डाएट व शालेय शिक्षण विभाग यांच्या सोबत विविध उपयुक्त उपक्रम प्राथमिक शिक्षणासाठी राबविले आहेत.

सर फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘राष्ट्रीयस्तर नवोपक्रम स्पर्धा २०२०’ मधून या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ‘एज्युकेशन इनोव्हेशन बँक’ या प्रकल्पांतर्गत हा अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर तज्ज्ञ कमिटीमार्फत ही निवड केली जाते.

राजकिरण चव्हाण हे सोलापूरातील श्री समर्थ विद्यामंदिर येथे कार्यरत असून लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांना तंत्रस्नेही होण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या 'ट्रेनिंग फ्रॉम होम' या नवोपक्रमाची या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या पुरस्काराचे वितरण सर फाऊंडेशन, स्टेम व जस्ट लर्निंग कडून डिसेंबर २०२० मध्ये आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘कॉन्फरन्स’ मध्ये होणार आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या ‘एज्युकेशनल इनोव्हेशन्स कॉन्फरन्स २०२०’ मध्ये विविध विषयावर शैक्षणिक मंथन होणार आहे.

शिक्षणतज्ज्ञ व्याख्यान, परिसंवाद, गटचर्चा, नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाचे सादरीकरण, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमाची मेजवानी सहभागी शिक्षकांना मिळणार आहे. अशी माहिती सर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य समन्वयक हेमा शिंदे, बाळासाहेब वाघ, सिद्धाराम माशाळे यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments