Hot Posts

6/recent/ticker-posts

नळदुर्ग येथील उपजिल्हारूग्णालयाचे मनसेने केले प्रतिकात्मक उद्घाटन

नळदुर्ग येथील उपजिल्हारूग्णालयाचे मनसेने केले प्रतिकात्मक उद्घाटन


रूग्णालय तात्काळ चालु करा - जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे

नळदुर्ग दि.४(क.वृ.)नळदुर्ग येथील उपजिल्हारूग्णालयाच्या नूतन इमारतीचे काम गेल्या सहा वर्षांपासून निधीअभावी रखडलेल्या अवस्थेत असून अद्यापही हे काम पुर्ण झाले नाही. सदर इमारतीच्या काही भागाचे काम पूर्ण झाले आहे. याच ठिकाणी लवकरात लवकर रूग्णालयाचे कामकाज सूरू करून  नळदुर्ग शहर व परिसरातील जवळपास ५० ते ६० गावातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. तसेच नुकतेच याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी याठिकाणी "घंटानाद" आंदोलनही करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एका बड्या राजकीय नेत्यानेही या ठिकाणी पत्रकार परिषदेत बोलताना ,राज्याच्या आरोग्यमंत्र्यांशी आपले बोलणे झाले असून, लवकरच हे रूग्णालय सुरू होईल असे आश्वासन दिले होते. प्रशासनाकडूनही २ ऑक्टोबर २०२० रोजी सदर उपजिल्हारूग्णालय सुरू करण्यात येईल असे जाहिर केले होते. परंतु २ ऑक्टोबर हि तारीख सुद्धा होवून गेली. अद्यापही या ठिकाणी हे उपजिल्हारूग्णालय सुरू होण्यासाठी कसल्याही प्रकारच्या हालचाली प्रशासनाकडून दिसून येत नाहीत. केवळ जनतेची दिशाभूल करून श्रेय लाटण्यासाठी कांही राजकीय नेत्यांनी खटाटोप केला होता.

यामुळे नळदुर्ग शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक चालढकल करीत सदर उपजिल्हारूग्णालय तात्काळ सुरू न करणार्या प्रशासनाचा जाहिर निषेध नोंदवित,आज दि.३ आॅक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या हस्ते, उपजिल्हारूग्णालयाच्या नूतन इमारतीचे  प्रतिकात्मक "उद्घाटन" करण्यात आले. या कार्यक्रमास उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हासचिव ज्योतिबा येडगे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून कुंभार,जनहित व विधी विभागाचे तालुकाध्यक्ष ॲड. मतिन बाडेवाले, मनसे शहराध्यक्ष अलिम शेख, शहरसचिव प्रमोद कुलकर्णी,मनविसे शहरसचिव भाऊराज कांबळे, अझर शेख यांच्या सह कार्यकर्ते (कोविड 19 चे नियमांचे पालन करून)  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments