Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापुरात मराठा मोर्चा पञकार परिषद

तुळजापुरात मराठा मोर्चा पञकार परिषद 


शिववरदायनीचा आर्शिवाद घेवुन मराठा आंदोलनाचा तिसऱ्या पर्वास देवी दरबारातुन आरंभ करणार !
मोर्चात आरोग्य सुरक्षा साधने वापरत मोठ्या संखेने सहभागी व्हा !
आरक्षणला   स्थगिती मिळाल्यास आंदोलन ऐवजी   आनंदोत्सव साजरा करणार !

तुळजापूर दि.४(क.वृ.):- छञपती शिवाजी महाराजांनी सुराज्य निर्मिती साठी श्रीतुळजाभवानी मातेचा आशिर्वाद घेत असत त्याच धर्तीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मराठ्यांना संघर्ष करण्यासाठी बळ उर्जा मिळण्यासाठी देवी दरबारात जागर करुन मराठा आरक्षण लढाईचा तिसऱ्या पर्वाची सुरुवात  रणशिंग 9आँक्टोबर फुकंला जाणार असुन कुठल्याही दडपशाही दबावाला बळी न पडता हा मोर्चा निघणारच असुन तरी समाज बांधवांनी यात मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते तथा नगराध्यक्ष सचिन रोचकरी व नेते सज्जन सांळुके यांनी पञकार परिषदेत केले. तिर्थक्षेञ तुळजापूरात 9 आ़क्टोबर रोजी होणाऱ्या मराठा आंदोलन पर्वाचा व ठोक मार्चाची रुपरेषा सांगण्यासाठी पञकार परिषद घेतली त्यात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना सज्जन सांळुके सचिन रोचकरी पुढे म्हणाले कि, मराठा आरक्षणास स्थगिती कशी काय मिळाली याचा जाब या मोर्चा ध्दारे सरकारला विचारण्यात येणार आहे. 9 आ़ँक्टोबर पर्यंत आरक्षणला स्थगिती मिळाल्यास आंदोलन ऐवजी आनंदोत्सल साजरा करणार असल्याचे यावेळी म्हणाले.  

9 आँक्टोबर   रोजी प्रथमता सकाळी अकरा वाजता  छञपती संभाजी महाराजांचा पुतळ्यास अभिवादन करुन हा मोर्चा छञपती शिवाजी महाराज चौकातुन आरंभ होणार आहे हा मोर्चा भवानी रोड मार्ग महाध्दार चौकात आल्यानंतर  येथे श्रीतुळजाभवानी महाध्दार समोर जागर कार्यक्रम होणार आहे.

या मोर्चा साठी मराठवाड्या सह पश्चिम महाराष्ट्रातील समाज बांधव सहभागी होणार आहेत. या मोर्चा साठी उस्मानाबाद रोडवर हाडको ,नळदुर्ग रोडवर सैनिक शाळा क्रिडांगण, लातूर रोडवरुन येणाऱ्यांना बसस्थानक समोरील जागा व सोलापूर बार्शी वरुन येणाऱ्या वाहनांना श्रीतुळजाभवानी महाविधालय शिंदे हायस्कुल मैदान येथे वाहनांसठी सोय करण्यात आली आहे,हा मोर्चा सकाळी 11वाजता आरंभ होवुन दोन वाजता याचा समारोप केला जाणार आहे.

यात जागर व्यासपीठावर  कुठल्याही पक्षाचा संघटनांचा नेत्याला प्रवेश नसणार असुन भाषणे होणार नाही. प्रथमता शाहीर पोवाड्यांचा कार्यक्रम होवुन नंतर जागर कार्यक्रम होणार आहे. मागण्यांचे निवेदन महाध्दार समोर दिले जाणार असुन प्रशाषाणातील अधिकारी आले तर त्याला देण्यात येईल अन्यथा राजमाता जिजाऊ महाध्दार चा प्रथम पायरी वर ठेवले जाणार आहे.

या मोर्चास मुस्लीम दलित बांधव ही सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगितले. या मोर्चास विविध पक्ष संघटना समाज हे पाठींबा देण्यासाठी येत असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी बोलताना नगराध्यक्ष सचिन रोचकरी म्हणाले कि, 'कोरोना पार्श्वभूमीवर या आंदोलनात सहभागी होणाऱ्या समाज बांधवांच्या आरोग्याची पुर्णता काळजी नगरपरिषद वतीने घेतली जाणार आहे. आंदोलन स्थळ निर्जतुकिकरण केले जाणार आहे. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला सँनिटायझ करुनच आंदोलन स्थळी प्रवेश दिला जाणार आहे. पाच हजार मास्क उपलब्ध करुन दिले जाणार आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना भोजन नाष्टा चहा देण्याचा मानस होता परंतु कोरोना ससंर्ग पसरु नये यासाठी फक्त स्वछ पिण्याचे पाणी दिले जाणार आहे. यात सहभागी होणाऱ्यांनी मास्क घालुन सँनिटायझरचा वापर करीत सोषल डिस्टंन्स पाळुन आंदोलनात सहभागी होवुन आजपर्यत झालेल्या मराठा समाजांचा मोर्चा प्रमाणेच शांततेत यशस्वी करावा' असे आवाहन यावेळी सहभागी बांधवांना केले.

यावेळी महेश गवळी, प्रतिक रोचकरी, अर्जुन सांळुके, सचिन कदमा, कुमार टोले, आबासाहेब कापसे, अजय सांळुके अदि सकल मराठा समाज बांधव उपस्थितीत होते.

Reactions

Post a Comment

0 Comments