हयातीचे दाखले देण्यास डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

सोलापूर, दि.५(क.वृ.): कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना हयातीचे दाखले सादर करण्यास डिसेंबर 2020 अखेर मुदतवाढ देण्यात येत असल्याचे गट विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना नोव्हेंबर अखेर हयातीचा दाखला सादर करावा लागतो. मात्र कोरोनामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या निवृत्ती वेतनधारकांचे वय 1 ऑक्टोबर 2020 ला 80 वर्षे पूर्ण होत आहे, त्यांना 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर 2020 या कालावधीत हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. तसेच निवृत्ती वेतनधारकांनी वारस प्रमाणपत्र फॉर्म-42 हा भरून सादर करण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.
0 Comments